सासूच्या प्रेमात जावई झाला वेडा! सासऱ्याने आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडलं अन्... नंतर, घडला भयानक प्रकार
आपल्याच सासूच्या प्रेमात वेडा झालेल्या एका तरुणाने पत्नीसोबत भयानक कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी तरुणाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सासूच्या प्रेमात जावई झाला वेडा!

सासऱ्याने आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडलं अन्...
Crime News: नातेसंबंधाला काळीमा फासणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्याच सासूच्या प्रेमात वेडा झालेल्या एका तरुणाने पत्नीसोबत भयानक कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी तरुणाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबद्दल पीडितेच्या घरच्यांना कळताच ते महिलेच्या सासरी गेले आणि त्यावेळी आरोपी पती तिथून फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे.
आक्षेपार्ह फोटो समोर आले
या धक्कादायक घटनेनंतर मृत महिलेची आई आणि आरोपी पतीचे काही आक्षेपार्ह फोटो समोर आले. सध्या, पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून त्याचं पोस्टमॉर्टम देखील करण्यात आलं आहे. सध्या, पोलिसांनी या हत्याप्रकरणाचा तपास सुरू केला असल्याचं सांगण्यात येत आहे. ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशातील कासगंजच्या जनपद येथील सिढपुरा परिसरातील नरला पारसीमध्ये घडल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: विरार: दोन मित्र इमारतीच्या 18 व्या मजल्यावर गेले अन् एकत्र उडी मारून... कॉलेजच्या तरुणांनी उचललं टोकाचं पाऊल
लग्नाच्या सहा महिन्यांनंतर सासूसोबत प्रेमसंबंध...
प्रकरणातील मृत तरुणीचं नाव शिवानी (24) असून ती कासगंजच्या गंजडुंडवारा परिसरातील पालिया गावाची रहिवासी होती. शिवानीचे वडील नारायण सिंग यांना या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, 2018 मध्ये दिल्लीमध्ये प्रायव्हेट नोकरी करणाऱ्या प्रमोद नावाच्या तरुणासोबत त्यांच्या मुलीचं लग्न झालं होतं. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर, जावयाचे त्याच्या सासूसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. पुढे मृताच्या वडिलांनी सांगितलं की, सुरूवातीला या गोष्टीबद्दल कोणतीच कल्पना नव्हती, पण जावयाचं घरी सतत येणं-जाणं आणि मुलीला मारहाण करण्यात आल्याने कुटुंबियांना प्रमोदवर संशय आला.
हे ही वाचा: MBBS च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं! हुशार तरुणीसोबत काय घडलं? सोलापुरातील धक्कादायक घटना
खरंतर, आरोपी तरुण आणि त्याच्या सासूला बऱ्याचदा आक्षेपार्ह स्थितीत पकडण्यात आलं होतं. नारायण सिंग यांनी दोघांच्याही या नात्याचा विरोध केल्यानंतर त्यांची पत्नी आणि प्रमोदने त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, आरोपी प्रमोदने त्याच्या पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला असल्याचं देखील त्याने सांगितलं. शिवानी आणि प्रमोदला दोन मुलं असल्याची माहिती आहे. आता पोलीस या घटनेचा तपास करत असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.