'मेंढ्या मूत्रविसर्जन करतात, तो चारा आमची म्हैस खात नाही', मेंढपाल महिलेला बेदम मारहाण; प्रकरण नेमकं काय?
Pune Crime : 'मेंढ्या मूत्रविसर्जन करतात, तो चारा आमची म्हैस खात नाही', असं म्हणत एकाने मेंढपाल महिलेला बेदम मारहाण केली आहे. प्रकरण नेमकं काय?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

'मेंढ्या मूत्रविसर्जन करतात, तो चारा आमची म्हैस खात नाही'

मेंढपाल महिलेला बेदम मारहाण; प्रकरण नेमकं काय?
Pune Crime : "मेंढ्या मूत्रविसर्जन करतात, आणि तो चारा आमची म्हैस खात नाही, तुमच्या मेंढ्या इथून काढा" असं म्हणत एकाने मेंढपाल महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीये. पुण्याच्या देहूरोड परिसरात ही घटना घडलीये. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अनाबाई राहुल पांडुळे असं मारहाण झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी लक्ष्मण गुरु याला अटक केली आहे.
"ही जागा तुमच्या मालकीची आहे का?" सवाल करताच महिलेला मारहाण
अधिकची माहिती अशी की, पुण्याच्या देहूरोडमध्ये मेंढपाळ महिलेला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. घटनेनंतर तात्काळ देहूरोड पोलिसांनी आरोपीला अटक केली. अनाबाई राहुल पांडुळे असं मारहाण झालेल्या महिलेचं नाव आहे. लक्ष्मण गुरू असं आरोपी तरुणाचं नाव आहे. अनाबाई दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील देहूरोड येथील दत्त मंदिर परिसर, लष्कराच्या मैदानात मेंढ्या चारत होत्या, त्यांच्यासोबत इतरही काही सहकारी होते. "मेंढ्या मूत्रविसर्जन करतात, आणि तो चारा आमची म्हैस खात नाही, तुमच्या मेंढ्या इथून काढा" असं आरोपी म्हणाला. आरोपीने असं म्हणताच महिलेने "ही जागा तुमच्या मालकीची आहे का?" असा सवाल केला. त्यानंतर आरोपी संतापला आणि लक्ष्मण गुरू या आरोपीने काठीने बेदम मारहाण केली. अनाबाई यांचा हात फॅक्चर झाला, लाथा बुक्क्यांनी पायावर मारहाण करण्यात आली. देहूरोड पोलिसांनी ही घटना तीन दिवसांपूर्वी घडलेली आहे.
फडणवीस सरकार कुठे आहे? मेढपाल बांधवांचा सवाल
दरम्यान, मारहाण झाल्यानंतर काही मेंढपाल घटनास्थळी पोहोलचे आहेत. "मेंढपालांवर महाराष्ट्रात सगळीकडे हल्ले केले जात आहेत. आमच्या वयस्कर बांधवांना देखील मारहाण करण्यात आली आहे. फडणवीस सरकार कुठे आहे? आमच्या भगिणींना मारहाण केली जात आहे. एका समाजाचा नाही, माणुसकीचा विषय लक्षात घ्या. शासनाच्या रानात मेढरं चारायला नेले, ही आणची चूक आहे का? आमच्या भगिनीला हात तुटेपर्यंत मारहाण झाली आहे", असं मत मेंढपाल बांधवांनी व्यक्त केलं.