लग्नानंतर दोन महिन्यात फसवणूक केल्याचा धनश्री वर्माचा आरोप, युजवेंद्र चहल म्हणाला, तिचं घर आजही...
yuzvendra chahal on dhanashree verma : लग्नानंतर दोन महिन्यात फसवणूक केल्याचा धनश्री वर्माचा आरोप, युजवेंद्र चहल म्हणाला, तिचं घर आजही...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लग्नानंतर दोन महिन्यात फसवणूक केल्याचा धनश्री वर्माचा आरोप

धनश्री वर्माच्या आरोपांनंतर युजवेंद्र चहलकडून प्रत्युत्तर
yuzvendra chahal on dhanashree verma : डान्सर आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा सध्या ‘राईज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. या शोमध्ये धनश्रीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. तिने क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबतचे नातं कशामुळे टिकलं नाही? याबाबत तिने भाष्य केलं होतं. शिवाय धनश्रीने चहलवर फसवणुकीचे आरोप देखील केले होते. धनश्री वर्माने सांगितले की, लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच तिने युजवेंद्रला रंगेहात पकडले होते. आता या आरोपांवर युजवेंद्र चहलने प्रतिक्रिया दिली आहे.
युजवेंद्र चहलची प्रतिक्रिया
हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना युजवेंद्र चहल म्हणाला, “मी एक खेळाडू आहे आणि मी कधीही फसवणूक करत नाही. जर कोणी दोन महिन्यांतच फसवणूक केली असती, तर ते लग्न एवढा काळ टिकलं असतं का? माझ्यासाठी तो विषय संपला आहे. मला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. मी माझ्या आयुष्यात पुढे गेलो आहे आणि इतरांनीही तसं करायला हवं.”
युजवेंद्र चहल पुढे बोलताना म्हणाला, “माझं आणि धनश्रीचं लग्न साडेचार वर्षं टिकलं. अजूनही काही लोक त्या गोष्टीला धरून बसले आहेत. अजूनही तिचं घर माझ्या नावावर चालतंय, त्यामुळे ती हे करत राहील. मला त्याचं काही वाटत नाही. आता मला याचा काहीही परिणाम होत नाही. मला असं वाटतंय की, मी याबद्दल आज शेवटच्या वेळस बोलतोय. माझ्यासाठी हा विषय संपला आहे. मी आता यावर बोलणार नाही, मी माझ्या पुढच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करतोय.”