वनडे क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंचुरी, 35 षटकार लगावत 314 धावा ठोकल्या; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची वादळी खेळी

मुंबई तक

Harjas Singh Triple Century In ODI : वनडे क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंचुरी, 35 षटकार लगावत 314 धावा ठोकल्या; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची वादळी खेळी

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूने झळकावली ट्रिपल सेंचुरी

point

35 षटकार लगावत 314 धावा ठोकल्या; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची वादळी खेळी

Harjas Singh Triple Century In ODI : क्रिकेटच्या मैदानावर कधी कधी अशा  विलक्षण खेळी पाहायला मिळतात, ज्या इतिहास घडवून जातात. ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघातील माजी खेळाडू हरजस सिंग याने असाच एक कारनामा केला आहे. न्यू साउथ वेल्स प्रीमियर क्रिकेट स्पर्धेतील एका सामन्यात हरजस सिंग याची जबरदस्त खेळी पाहून सर्वच जण थक्क झाले. वेस्टर्न सबअर्ब संघाकडून खेळताना हरजसने सिडनी क्रिकेट क्लबविरुद्धच्या 50 षटकांच्या सामन्यात तिहेरी शतक ठोकून इतिहास रचलाय.

50 षटकांच्या सामन्यात ट्रिपल सेंचुरी शतक

हा रोमांचक सामना 4 ऑक्टोबर 2025 रोजी प्रॅटन पार्क येथे खेळला गेला. या सामन्यात वेस्टर्न सबअर्बने सिडनीविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. त्यानंतर 10व्या षटकात कटलर बाद झाल्यावर तिसऱ्या क्रमांकावर हरजस सिंग खेळायला आला. मैदानात पाऊल ठेवताच त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई करण्यात सुरुवात केली.  20 व्या षटकात त्याने केवळ 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याची गाडी थांबली नाही आणि केवळ 141 चेंडूत 314 धावा ठोकत त्याने वादळी खेळी केली. 

हेही वाचा : Maharashtra Weather: राज्यात पावसाचा जोर, चंद्रपूर, गडचिरोलीसह विदर्भात येलो अलर्ट जारी

शतक गाठण्यासाठी त्याने 74 चेंडू घेतले, परंतु त्यानंतर त्याने षटकारांचा वर्षाव केला. हरजसने फक्त 103 चेंडूत दुहेरी शतक झळकावले, म्हणजे दुसरे शतक फक्त 29 चेंडूंवर आले. त्यानंतरही तो थांबला नाही आणि 132 चेंडूंवर 301 धावा पूर्ण केल्या. या ऐतिहासिक खेळीत त्याने 35 षटकार आणि 12 चौकार ठोकले. हरजस सिंगच्या तिहेरी शतकाच्या जोरावर वेस्टर्न सबअर्ब संघाने सिडनी क्रिकेट क्लबविरुद्ध 5 विकेट्सवर 483 धावांचा प्रचंड डोंगर उभा केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp