दिल्लीतील नेहरु स्टेडियमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, विदेशातून आलेल्या दोन प्रशिक्षकांचा चावा घेतला
World Para Athletics championship
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दिल्लीतील नेहरु स्टेडियमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट

विदेशातून आलेल्या दोन प्रशिक्षकांचा चावा घेतला
World Para Athletics championship : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेदरम्यान दोन विदेशी प्रशिक्षकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे प्रशिक्षक केनिया आणि जपान येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर दिल्ली महानगरपालिकेने (MCD) स्टेडियम परिसरात चार पथके तैनात केली असून, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
केनियाचे प्रशिक्षक डेनिस मरागिया हे स्टेडियममधील स्पर्धा क्षेत्राबाहेर आपल्या खेळाडूशी बोलत असताना एक भटका कुत्रा अचानक आला आणि त्यांचा चावा घेतला. त्याचप्रमाणे जपानच्या प्रशिक्षिका मेइको ओकामात्सु आपल्या खेळाडूंच्या प्रशिक्षणावर लक्ष ठेवत असताना त्यांनाही कुत्र्याने चावा घेतला. दोघांनाही तत्काळ वैद्यकीय कक्षात प्राथमिक उपचार देण्यात आले आणि त्यानंतर सफदरजंग रुग्णालयात नेऊन संपूर्ण उपचार करण्यात आले. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असून धोका टळला आहे.
महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, स्टेडियममध्ये एकूण 21 प्रवेशद्वार आहेत आणि चार पथके आधीच तैनात करण्यात आली आहेत, जेणेकरून अशा प्रकारची घटना घडू नये. अधिकारी म्हणाले की, 25 सप्टेंबरपासून आतापर्यंत स्टेडियम परिसरातून 22 भटक्या कुत्र्यांना पकडण्यात आलं आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather: राज्यात पावसाचा जोर, चंद्रपूर, गडचिरोलीसह विदर्भात येलो अलर्ट जारी