अरबी समुद्रात घोंगावतंय शक्ती चक्रीवादळ, महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; कुठे पडणार पाऊस?

मुंबई तक

Shakti Cyclone : अरबी समुद्रात घोंगावतंय शक्ती चक्रीवादळ, महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; कुठे पडणार पाऊस?

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अरबी समुद्रात घोंगावतंय शक्ती चक्रीवादळ

point

महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Shakti Cyclone, रत्नागिरी : अरबी समुद्रात सध्या शक्ती चक्रीवादळ घोंगावत आहे. या चक्रीवादळामुळे राज्य प्रशासन अॅक्शन मोडवर आलंय. ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे राज्य प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम लक्षात घेता रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबरपर्यंत मुंबई आणि कोकण किनारपट्टीला या वादळाचा मध्यम तीव्रतेचा फटका बसू शकतो.

सध्या तरी या चक्रीवादळाचा थेट परिणाम किनारपट्टीवर दिसून आलेला नाही. तथापि, पुढील काही दिवसांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोकणातील अनेक भागांमध्ये पडण्याची शक्यता आहे. ‘शक्ती’ वादळ पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत असून, खोल समुद्रात त्याचा जोरदार परिणाम राहणार आहे.

हेही वाचा : परभणी : सहलीला गेलेल्या विद्यार्थींचा शिक्षकाने कपडे बदलतानाचा व्हिडीओ बनवला, AI चा वापर अन् संतापजनक कृत्य

प्रशासनाकडून मच्छीमारांना महत्त्वाचं आवाहन 

खोल समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी सुमारे 50 किलोमीटरपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या सूचनांनुसार, काही वेळा समुद्रकिनारी वादळी वारे आणि पावसाच्या सरींचा अनुभव येऊ शकतो.

हे वाचलं का?

    follow whatsapp