मुलाचं अपहरण केलं अन् आईला ब्लॅकमेल... शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

दोन महिलांच्या मुलांचं अपहरण केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुलांचं अपहरण करणाऱ्या आरोपींनी पीडित महिलांवर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा दबाव आणल्याचा संबंधित महिलांनी आरोप केल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव
शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव,
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुलाचं अपहरण केलं अन् आईला ब्लॅकमेल...

point

शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव

Crime News: राजधानी दिल्लीमधून दोन धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे दोन महिलांच्या मुलांचं अपहरण केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुलांचं अपहरण करणाऱ्या आरोपींनी पीडित महिलांवर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा दबाव आणल्याचा संबंधित महिलांनी आरोप केल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली असून यासंदर्भात गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. आता पोलीस या घटनेचा तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे. 

तीन वर्षांच्या मुलाचं अपहरण 

पहिलं प्रकरण हे दिल्लीतील कृष्णा नगर पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याची माहिती आहे. एका महिलेने संबंधित पोलीस ठाण्यात आपल्या शेजारच्या तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. पीडितेने पोलिसांत तक्रार करताना सांगितलं की तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने आपल्या तीन वर्षांच्या मुलाचं अपहरण केलं. त्यानंतर, आरोपीने तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला. 

शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव 

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणातील आरोपी व्यक्ती ही पीडितेला दोन ते तीन महिन्यांपासून ओळखत असल्याचं महिलेने सांगितलं. तसेच, आरोपीने पीडितेवर लग्न करण्यासाठी दबाव आणला असल्याचा गंभीर आरोप महिलेने केला. यावर पीडित महिलेने आरोपीला लग्न करण्यासाठी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर, आरोपीने रागाच्या भरात महिलेच्या तीन वर्षांच्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने बाहेर नेलं आणि त्याचं अपहरण केलं. या तक्रारीनंतर, पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. 

हे ही वाचा: रोहित शर्माला कर्णधारपदावरून कोणी काढलं? अजित आगरकरने थेट सांगितली 'ती' गोष्ट

पोलिसांच्या तपासादरम्यान, आरोपी तरुण सूरत रेल्वे स्टेशनवर असल्याचं समोर आलं. त्यानंतर, दिल्ली पोलिसांनी स्थानिक रेल्वे पोलिसांना यासंबंधी माहिती दिली आणि त्यावेळी, रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर, आरोपीला पोलिसांनी लगेच दिल्लीला आणलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp