परभणी : सहलीला गेलेल्या विद्यार्थीनीचा शिक्षकाने कपडे बदलतानाचा व्हिडीओ बनवला, AI चा वापर अन् संतापजनक कृत्य
Parbhani Crime : सहलीला गेलेल्या विद्यार्थीनी शिक्षकाने कपडे बदलतानाचा व्हिडीओ बनवला, AI चा वापर अन् अत्याचार; परभणी जिल्ह्यातील संतापजनक प्रकार समोर
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सहलीला गेलेल्या विद्यार्थींचा शिक्षकाने कपडे बदलतानाचा व्हिडीओ बनवला

परभणी जिल्ह्यातील संतापजनक प्रकार समोर
Parbhani Crime : परभणी जिल्ह्यातून संतापजनक घटना समोर आलीये. शाळेची सहल गेलेली असताना एका शिक्षकाने विद्यार्थीनीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढालाय. हा विकृत शिक्षक एवढ्यावरच थांबला नाही. त्याने कृत्रीम बुद्धीमत्ता म्हणजे एआयचा वापर करुन तिचे आणखी काही अश्लील व्हिडीओ बनवले आणि तिला ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दरम्यान, या प्रकरणी पीडित तरुणीने 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 16 वर्षीय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी या शिक्षकासह एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे. संतोष मलसटवाड असं अटक करण्यात आलेल्या नराधम शिक्षकाचं नाव आहे.
विद्यार्थीनी सहलीला गेल्यानंतर शिक्षकानेच केलं कृत्य
अधिकच्या माहिती अशी की, संतोष मलसटवाड हा नराधम परभणीतील एका शाळेत शिक्षक आहे. या शाळेने रायगड आणि महाबळेश्वर या ठिकाणी शाळेची सहल काढली होती. दरम्यान, सहलीदरम्यान विकृत मानसिकता असलेल्या संतोषने 16 वर्षीय विद्यार्थीनी कपडे बदलत असताना गुपचूप व्हिडीओ काढला. त्यानंतर एआयचा वापर करुन काही अश्लील व्हिडीओ देखील बनवले आणि ब्लॅकमेल करुन लैंगिक शोषण केलं.
हेही वाचा : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात वडील शहीद झाले, 17 वर्षांच्या संघर्षमय आयुष्यानंतर मुलीला मिळाली सरकारी नोकरी