डोंबिवली: "मोबाईलचा पासवर्ड कोणी बदलला?.." क्षुल्लक कारणावरून झालेला वाद टोकाला पोहोचला, पट्ट्यासह बेदम मारहाण अन्...

मुंबई तक

मुंबईतील डोंबिवली शहरात मोबाईलचा पासवर्ड बदलल्याच्या कारणामुळे घरातील महिलेला आणि मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

क्षुल्लक कारणावरून झालेला वाद टोकाला पोहोचला
क्षुल्लक कारणावरून झालेला वाद टोकाला पोहोचला (फोटो सौजन्य: Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मोबाईलचा पासवर्ड बदलल्यावरून मोठा वाद

point

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात पट्ट्यासह बेदम मारहाण अन्...

Mumbai Crime: मुंबईतील डोंबिवली शहरात एका सुशिक्षित कुटुंबात क्षुल्लक कारणावरून झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्याची बातमी समोर आली आहे. मोबाईलचा पासवर्ड बदलल्याच्या कारणामुळे घरातील महिलेला आणि मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित कुटुंबीय हे खोणी पलाव्यातील कासा एड्रियाना सोसायटीत भाड्याच्या घरात राहत असून केवळ आजोबांच्या मोबाईलचा पासवर्ड बदलल्याने ही हिंसाचाराची मोठी घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरूवात केल्याची माहिती आहे. 

मुलाने दाखल केली तक्रार 

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणासंदर्भात बिकाशकुमार यादव नावाच्या तरुणाने तक्रार दाखल केली असून तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करतो.  संबंधित तक्रारदार डोंबिवलीपासून काही किमी अंतरावर असलेल्या खोणी पलाव्यात कासा एड्रियाना सोसायटीत आपली आई रेणू, मोठा भाऊ आकाशकुमार, आजोबा राजेंद्र राय आणि आजी मालतीदेवी यांच्यासोबत राहतो. 

हे ही वाचा: मुलाचं अपहरण केलं अन् आईला ब्लॅकमेल... शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव, नेमकं प्रकरण काय?

पासवर्ड बदलल्याचा जाब विचारला अन्...

दरम्यान, बिकाशकुमारचे आजोबा राजेंद्र राय हे सेवानिवृत्त असून त्यांनी निवृत्ती वेतन मिळतं. मागील आठवड्यातच, रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आजोबांनी त्यांच्या सुनेला म्हणजेच रेणूला आपल्या मोबाईलमधील पासवर्ड कुणी बदलला? असा जाब विचारला. त्यावेळी, आजोबांच्या सांगण्यावरूनच पासवर्ड बदलला असल्याचं मोठा भाऊ आकाशकुमार याने सांगितलं. याच कारणामुळे, दोन्ही भावांमध्ये मोठा वाद झाला आणि हे भांडण थेट मारहाणीपर्यंत पोहोचलं. 

हे ही वाचा: परभणी : सहलीला गेलेल्या विद्यार्थीनी शिक्षकाने कपडे बदलतानाचा व्हिडीओ बनवला, AI चा वापर अन् संतापजनक कृत्य

तवा आणि पट्ट्यासह बेदम मारहाण

मोबाईल पासवर्डवरून झालेल्या वादात आजोबा आणि आकाशकुमारने रागाच्या भरात स्वयंपाक घरातील लाटणं, तवा आणि पट्ट्यासह बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. यामध्ये 47 वर्षीय पीडित महिला रक्तबंबाळ झाली असून मुलगा सुद्धा गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली. आता, पीडितांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. मुलाच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या, दोन्ही पीडितांची प्रकृती ठिक असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp