cough syrup मुळे दहा जणांचा मृत्यू, पोलीस प्रशासनाला आली जाग, डॉक्टरांना उचललं

मुंबई तक

Cough Syrup : मध्य प्रदेशातील छिंदवाडात 10 मुलांचा मृत्यू झाला, यामुळे केवळ मध्य प्रदेशच नाही,तर संपूर्ण देश हादरून गेला आहे. देशभरात या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. कप सिरपमुळे निष्पापांचे बळी गेल्यानंतर आता कुठे तरी प्राशसनाला जाग आली आहे. पोलीस प्रशासनाने संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करत औषध लिहून देणाऱ्याला डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

 cup syrup
cup syrup
social share
google news

बातम्या हायलाइट

point

छिंदवाडात कप सिरपमुळे 10 मुलांचा मृत्यू

point

डॉक्टर अटकेत

Cough Syrup : मध्य प्रदेशातील छिंदवाडात 10 मुलांचा मृत्यू झाला, यामुळे केवळ मध्य प्रदेशच नाही,तर संपूर्ण देश हादरून गेला आहे. देशभरात या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. कप सिरपमुळे निष्पापांचे बळी गेल्यानंतर आता कुठे तरी प्राशसनाला जाग आली आहे. पोलीस प्रशासनाने संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करत औषध लिहून देणाऱ्याला डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. डॉ. प्रवीण सोनी असं अटक केलेल्या डॉक्टरांचे नाव आहे. 

हे ही वाचा : 6 ऑक्टोबरपासून विष योग निर्माण होणार, याचा काही राशीतील लोकांना धोका मिळणार, काय सांगतं राशीभविष्य?

खोकल्याच्या औषधामुळे मुलांचा मृत्यू

खोकल्याच्या औषधामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्या चाचण्या केल्यानंतर.शनिवारी रात्री त्याचे रिपोर्टही समोर आले आहेत. रिपोर्टनुसार, खोकल्याच्या औषधामुळे मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्यांची तपासणी करत नंतर चाचण्याही करण्यात आल्या होत्या. शनिवारी रात्री त्याचे अहवाल देण्यात आले होते. याच रिपोर्टनुसार, खोकल्याच्या औषधात डायएथिलीन ग्लईकोलचे प्रमाण 48.6 टक्के इतके आहे, यामुळे आरोग्याला धोका निर्माण झालेला दिसतो. 

डॉ. प्रवीण सोनीने कफ सिरपची चिठ्ठी लिहून दिली

या प्रकरणात पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ड्राग्ज आणि कॉस्मेटिक कायद्यातील कलम 27(A), भारतीय न्याय संहिता कलम 1.5 आणि 276 चा समावेश असणार असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, या एकूण प्रकरणात डॉक्टरच्याविरोधात पससिया येथील आरोग्य केंद्राचे प्रमुख अंकित सहलाम यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणात मृत्यू झालेल्या बहुतांश मुलांना देण्यात आलेला कफ सिरप हा डॉ. प्रवीण सोनीने लिहून दिला असल्याचा आरोप आहे. 

हे ही वाचा : Maharashtra Weather: राज्यात पावसाचा जोर, चंद्रपूर, गडचिरोलीसह विदर्भात येलो अलर्ट जारी

संबंधित प्रकरणात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, "छिंदवाडामध्ये कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मुलांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आहे. या घटनेननं सिरपची विक्री मध्य प्रदेशात बंदी घालण्यात आली आहे. हे सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या इतर वस्तूंवरही बंदी घालण्यात आली आहे". 

हे वाचलं का?

    follow whatsapp