लग्नाचं आमिष दाखवून शरीरशोषण, लग्न दुसरीसोबत, मावशीचे भाच्यावरच धक्कादायक आरोप, नेमकं प्रकरण काय?
Crime News : मावशीने आपल्याच भाच्यावर लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक आरोप केला आहे. ती एवढ्यावरच न थांबता तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मावशीकडून भाच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप

नेमकं काय घडलं?
Crime News : मावशीने आपल्याच भाच्यावर लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक आरोप केला आहे. ती एवढ्यावरच न थांबता तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी आता पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता तरुणाला महिलेसोबत म्हणजेच मावशीसोबत विवाह करावा लागेल, यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तरुणाने दुसऱ्याच तरुणीशी विवाह केला. हे सर्व पाहून मावशीने पुन्हा एकदा आपल्याच भाच्यावर गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय समोर आला. ही घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहे. या प्रकरणाचा 1 जुलै 2022 रोजी मलपापुर ठाणे परिसरात गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा : विरारमधील 18 मजली इमारतीत आढळले विद्यार्थ्यांचे मृतदेह, आत्महत्या की हत्या? पालक म्हणाले, 'आमची मुलं कधीच...'
नेमकं काय घडलं?
मावशीने तिच्या काकाचा मुलगा हिमांशु रावतवर वारंवार लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला. महिलेनं केलेल्या आरोपानुसार, हिमांशु रावतचे महिलेच्या पतीसोबत चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे घरी येणं जाणं अधिक वाढू लागलं होतं. तेव्हा हिमांशुने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत तिचं लैंगिक शोषण केलं, अशी माहिती युपी तक या वृत्तमाध्यमाने दिली. या घटनेमुळे पतीनं आपल्या पत्नीला चार हात लांबच ठेवलं.
लग्नाचं आमिष आणि शरीरशोषण
काही वेळानंतर हिमांशुला जामीन मिळाला आणि तो तुरुंगातून बाहेर आला. तेव्हा कुटुंबियांनी माफी मागत लग्नाचं वचन देऊन खटला मागे घेण्यास सांगितला. त्यानंतर, हिमांशूचं पुन्हा महिलेच्या घरी येणं जाणं सुरु झालं. त्यानंतर तिला लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक शोषण करू लागला होता, असा आरोप आहे.
हे ही वाचा : बाप म्हणावं की कसाई? एका वर्षाच्या मुलावर धारदार शस्त्राने वार करत केला खून, आईनं सकाळी पाहिलं मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात
संबंधित प्रकरणात आता महिलेनं आरोप केला की, हिमांशुने दुसऱ्याच महिलेशी लग्न केले अशी माहिती समजताच विश्वासघात झाला. त्यानंतर मग तिने हिमांशुवर लैंगिक शोषणाचा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकली, पण हिमांशुविरोधात पुरेसे पुरावे न्यायालयात न दाखवल्याने प्रकरण समोर आलं.