Crime News: उत्तर प्रदेशातील कानपुर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे तक्रारीच्या तब्बल 10 महिन्यांनंतर पोलिसांनी एका बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या मृतदेहाच्या सांगाड्याचे अवशेष घराच्या मागील बागेतून ताब्यात घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. रविवारी पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली. सचेंडी येथील लालपुर गावाचा रहिवासी शिवबीर सिंग याची त्याच्या पत्नी आणि भाच्याने मिळून हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. मृताची पत्नी आणि भाच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
पत्नी आणि भाच्याचे अनैतिक संबंध...
मृताची पत्नी आणि तिचा भाचा अमित यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी पत्नीने तिच्या पतीला चहामध्ये मादक पदार्थ मिसळून प्यायला दिलं आणि त्यामुळे पीडित पती बेशुद्ध झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर आरोपी भाचा म्हणजेच अनितने पीडित तरुणावर कुदळीने हल्ला केला. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की हत्येनंतर मृत व्यक्ती म्हणजेच शिवबीरचा मृतदेह त्याच्या घरातील मागील बागेत जवळपास 100 मीटर दूर अंतरावर पुरण्यात आला.
हे ही वाचा: भाच्याचा मृत्यूनंतर मावशी हादरली, नंतर तिनेच 3 वर्षांच्या भाचीचा गळा आवळला अन् नंतर स्वत:...
सासूला खोटं सांगून केली दिशाभूल...
आरोपी लक्ष्मी म्हणजेच मृताची पत्नी तिचा पती कामानिमित्त गुजरातला गेला असल्याचं सासूला खोटं सांगत राहिली. मात्र, त्या काळात शिवबीरचा फोन बंद असल्याकारणाने मृताची आई सावित्री देवीने 19 ऑगस्ट रोजी सचेंडी पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारीनंतर संशय असल्यामुळे आरोपी लक्ष्मी आणि अमित यांना पोलिसांनी अटक केली. पोलीस उपायुक्तांनी सांगितलं की सुरुवातीला आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण कठोर चौकशीनंतर त्यांनी पोलिसांकडे त्यांचा गुन्हा कबूल केला.
हे ही वाचा: महिलेनं पहिल्या पतीची हत्या केली..आता BF सोबत मिळून दुसऱ्या पतीवर चाकूने वार केले..बाथरूममध्ये मृतदेह सापडला अन्..
बागेत खोदकाम केल्यानंतर सापडला सांगाडा...
आरोपींच्या कबुली जबाबाच्या आधारे, पोलिसांनी बागेत खोदकाम केलं आणि त्यावेळी सांगाड्याचे अवशेष, पीडित तरुणाची एक बनियान आणि एक लॉकेट जप्त करण्यात आले, याच आधारे कुटुंबियांनी शिवबीरची ओळख पटवली. "पीडिताची ओळख त्याच्या वैयक्तिक वस्तूंवरून झाली असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, शिवबीरला त्याच्या पत्नीचे भाच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचं कळताच दोन्ही पती- पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे. कॉल रेकॉर्डिंगवरून सुद्धा अमित आणि लक्ष्मीचे वारंवार संपर्क होत असल्याचं स्पष्ट झालं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
