लग्नानंतर पत्नीचे दोन तरुणांसोबत संबंध, विरोध केल्यावर धमक्या आणि छळ; शेवटी पतीने स्वत:ला संपवलं

लग्नानंतर मोहितच्या पत्नीचे दोन तरुणांसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले आणि तिने दोघांसोबत शारीरिक संबंध देखील प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. त्यानंतर, तिघांनी मिळून मोहितचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. शेवटी, या सगळ्याला वैतागून मोहितने फाशी घेत आयुष्य संपवल्याचं सांगितलं जात आहे.

लग्न झाल्यानंतर दोन वर्षांतच पत्नीचे दोघांसोबत अनैतिक संबंध

लग्न झाल्यानंतर दोन वर्षांतच पत्नीचे दोघांसोबत अनैतिक संबंध

मुंबई तक

• 04:53 PM • 20 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

लग्न झाल्यानंतर दोन वर्षांतच पत्नीचे दोघांसोबत अनैतिक संबंध

point

विरोध केल्यावर धमक्या आणि छळ

point

शेवटी पतीने स्वत:ला संपवलं

Crime News: उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील ठाकूरद्वारा परिसरातून अनैतिक संबंधाचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथील सिव्हिल कोर्टात स्टेनो म्हणून कार्यरत असलेल्या मोहित नावाच्या तरुणाचं 2023 मध्ये ज्योती (बदललेलं नाव) नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं होतं. मात्र, लग्नानंतर त्यांच्या नात्यात कालांतराने दुरावा निर्माण होऊ लागला आणि अखेर मोहितने आपलं आयुष्य संपवलं. नेमकं प्रकरण काय? 

हे वाचलं का?

लग्नानंतर दोन पुरुषांसोबत अनैतिक संबंध 

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर मोहितच्या पत्नीचे दोन तरुणांसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले आणि तिने दोघांसोबत शारीरिक संबंध देखील प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. त्यानंतर, तिघांनी मिळून मोहितचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. शेवटी, या सगळ्याला वैतागून मोहितने फाशी घेत आयुष्य संपवल्याचं सांगितलं जात आहे. आता, मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मोहितची पत्नी आणि तिच्या दोन प्रियकरांसह 12 लोकांविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. 

हे ही वाचा: सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमुळे 42 वर्षीय पुरुषाने संपवलं आयुष्य; बसमध्ये लैंगिक छळ केल्याचा आरोप...

मृताच्या वडिलांनी केला आरोप 

तक्रारीत मृताच्या वडिलांनी आरोप केला की मोहितने 2023 मध्ये नर्स म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणीसोबत लग्न केलं. लग्नानंतर काही काळातच तिचे एका डॉक्टरसोबत आणि नंतर, दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध सुरू झाले. मोहितला आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती मिळाली. यासाठी मोहितने विरोध केला असता पत्नीने तिच्या प्रियकर आणि सासरच्या लोकांसह मोहितला धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी मिळून त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. पत्नीच्या याच वागण्याला वैतागून पीडित पतीने आत्महत्या केली. 

हे ही वाचा: Govt Job: 10 वी पास ते ग्रॅज्युएट तरुणांसाठी सरकारी नोकरी! ना लेखी परीक्षा, ना मुलाखत... लवकर करा अप्लाय

पोलिसांच्या माहितीनुसार, मोहितच्या मृतदेहाजवळ सुसाइड नोट देखील सापडली असून ती ताब्यात घेण्यात आली आहे. या नोटमध्ये शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचं त्याने नमूद केलं आहे. आता, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच, आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं देखील पोलिसांनी आश्वासन दिलं. 

    follow whatsapp