Govt Job: 10 वी पास ते ग्रॅज्युएट तरुणांसाठी सरकारी नोकरी! ना लेखी परीक्षा, ना मुलाखत... लवकर करा अप्लाय
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) कडून तब्बल 405 अप्रेन्टिसशिप पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
10 वी पास ते ग्रॅज्युएट तरुणांसाठी सरकारी नोकरी!
ना लेखी परीक्षा, ना मुलाखत... काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Govt Job: सरकारी कंपनीत कोणत्याही परीक्षेशिवाय नोकरी मिळवायची असेल, तर 10 वी उत्तीर्ण ते पदवीधरांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) कडून तब्बल 405 अप्रेन्टिसशिप पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. यासाठी उमेदवार 31 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
IOCL अप्रेन्टिसच्या या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 18 वर्षे आणि कमाल 24 वर्षे वयोमर्यादा उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आली आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे. एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षे, ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि अपंग उमेदवारांसाठी 10 वर्षे उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
कशी होणार निवड?
या भरतीसंदर्भातील विशेष बाब म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केलेल्या मेरिट लिस्टवरून अप्रेन्टिस पदासाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर मेडिकल टेस्टसाठी बोलवण्यात येईल. याचाच अर्थ, कोणत्याही परीक्षेशिवाय उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे.
हे ही वाचा: वडिलांच्या तेराव्याच्या कार्यक्रमातच मुलाची निर्घृण हत्या! थेट घरात घुसून गुंडांचा हल्ला अन्...
शैक्षणिक पात्रता
टेक्निशिअन अप्रेन्टिस पदासाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात 3 वर्षांच्या इंजीनिअरिंग डिप्लोमाचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तसेच, ट्रेड अप्रेन्टिस पदांसाठी उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण आणि त्यासोबतच त्यांच्याकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे. पदानुसार पात्रता निश्चित करण्यात आली असून विस्तृत माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट तपासू शकतात.










