Today Shocking Viral News : झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महिलेवर बलात्कार करून तिचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृत महिलेच्या मुलाने याप्रकरणी तक्रार दाखल केलीय. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यात 50 वर्षीय महिलेचा सडलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी या घटनेबाबत म्हटलंय, महिलेसोबत एका व्यक्तीने बलात्कार करून तिची हत्या केली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं, मृत महिलेच्या मुलाने बरहेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. महिलेचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, असा आरोप मृत महिलेच्या मुलाने केला आहे.
ADVERTISEMENT
महिला गुरुवारी बेपत्ता झाली अन् नंतर घडलं...
पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की, महिला गुरुवारपासून बेपत्ता होती. शनिवारी स्थानिक लोकांना चिहाद डोंगराजवळ एक सुनसान ठिकाणी तिचा मृतदेह सापडला. बरहेट पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पवन कुमार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की, मृतदेह सापडल्यानंतर पीडित महिलेच्या मुलानं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
महिलेसोबत बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, अशी माहिती त्या मुलाने दिली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्यांनी म्हटलं की, मृतदेह पोस्टमार्टमसाठी दुमका रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये या घटनेबाबतची सर्व माहिती समोर येईल. प्राथमिक तपासानुसार असं समोर येतंय की, हा प्रकार लैंगिक शोषणाचा नसून हत्येचा आहे. दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
हे ही वाचा >> दोन तरुणी एकमेकींच्या प्रेमात आकंठ बुडाल्या! कोर्टात लग्न केलं, पण कुटुंबियांनी रुममध्ये असं काही केलं..सर्वांनाच बसला हादरा!
त्या ठिकाणीही घडली होती धक्कादायक घटना
उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. येथे एका अल्पवयीन मुलाने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून चुलत बहिणीसोबतच घृणास्पद कृत्य केल्याचा प्रकार घडला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं. आरोपींना अटक करून बालसुधार गृहात पाठवण्यात आलं आहे. संबंधित घटना ही गाझीपूरच्या सैदपूर ठाणे परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा >> फेसबुकवर झाली मैत्री, नंतर व्हिडीओ कॉलवर अश्लील चाळे... नंतर महिलेसोबत केलं नको ते! बुलढाण्यात खळबळ..
ADVERTISEMENT
