Shocking Murder Case Viral News : विषारी मशरूम खायला देऊन एका महिलेनं तीन जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. त्या महिलेनं सासू, सासरा आणि नणंदची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पतीचं नशिब इतकं चांगलं की, त्याचा जीव वाचला. न्यायालयात आता आरोपी महिलेला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 3 जणांची हत्या केल्याप्रकरणी आरोपी महिलेला 33 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियामध्ये घडली. एरिन पॅटरसन (33) असं आरोपी महिलेचं नाव आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेनं त्यांच्याच सासरच्या लोकांविरोधात विश्वासघात केला आणि हत्येचा कट रचून त्यांना जीवे मारलं. पॅटरसनने तिचा पहिला पती सिमोन पॅटरसन आणि तिच्या काका-मावशीला लंचसाठी बोलावलं. महिलेनं त्यांना सांगितलं की, तिला कर्करोग झाला आहे. दोन मुलांना याबाबत कसं सांगायचं ते कळत नाही. त्यामुळे सर्वांचा सल्ला घ्यायचा आहे. त्यानंतर सासऱ्याला या गोष्टीबाबत जसं कळलं, तो भावुक झाला. त्यानंतर तो त्याच्या सुनेला भेटण्यासाठी लंचसाठी गेला. तसच त्याच्यासोबत पत्नी गेल पॅटरसन आणि त्याची बहीण हीथर विल्किंसनही पोहोचली.
हे ही वाचा >> Thackeray Brother: उद्धव ठाकरे 'या' नेत्याला सोबत घेऊन अचानक का गेले राज ठाकरेंच्या घरी?, 'शिवतीर्थ'वर बंद दाराआड कोणत्या चर्चा?
जेवणात मिक्स केले विषारी मशरूम
एरीन पॅटरसनच्या या हत्येच्या कटाबाबत कोणालाच काही माहित नव्हतं. तिच्या नातेवाईकांना याबाबत जराही कल्पना नव्हती की, आरोपी महिलेचा नक्की काय प्लॅन आहे..तिने जेवणात डेथ कॅप मशरूम मिक्स केले होते. ते खूप विषारी होते. तिने दोन वेगवेगळ्या प्लेटमध्ये जेवण वाढलं आणि तिने स्वत: दुसऱ्या प्लेटमध्ये शुद्ध मशरूमची भाजी खाल्ली. परंतु, नातेवाईंकाना जेवणात विषारी मशरूम दिल्याने तिघांचीही तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी एरिनला नोव्हेंबर 2023 मध्ये अटक केलं होतं. पण तिच्यावर लावण्यात आलेले आरोप तिने फेटाळले. पण पोलिसांनी संशय तेव्हा वाढला, जेव्हा त्यांना खबर मिळाली की, त्या लोकांचा मृत्यू विषारी मशरूम खाल्ल्याने झाला. त्यामुळे रुग्णालयात त्यांना विषारी मशरूमचा एँटीटोड देण्यात आला नाही. त्यानंतर आरोपी महिलेनं गुन्हा कबूल केला आणि न्यायालयाने महिलेला 33 वर्षांची शिक्षा सुनावली.
हे ही वाचा >> बाईचा नाद लय बेकार! नर्तिकेच्या नादी लागला उपसरपंच, जमीन जुमला अन् सोनं नाणं सारंच लुटलं, अखेर स्वत:च्याच डोक्यावर बंदुक...
ADVERTISEMENT
