आधी तरुणीला बाजूच्या सीटवर बसण्यास सांगितलं, तरुणीने दिला नकार अन् कॅब चालक कारमध्येच करू लागला हस्तमैथून

crime news : एका चालकाचे विद्यार्थिनीसमोरच अश्लील कृत्य करत हस्तमैथून केलं. पोलिसांनी संबंधित प्रकरणात सोमवारी एफआरआय नोंदवून आरोपी चालक शंकरला बेड्या ठोकल्या आहेत.

crime news cab driver

crime news cab driver

मुंबई तक

• 12:06 PM • 10 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

कॅब चालकाचे विद्यार्थिनीसमोरच अश्लील कृत्य

point

हस्तमैथून करत चालकाचं हैवानी कृत्य

point

एफआरआय नोंदवून आरोपी चालक अटकेत

Crime News : मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये खासकरून कॅबच्या प्रमाणात वाढ होताना दिसते. पण, याच कॅबमध्ये अनेकदा तरुण तरुणी अश्लील वर्तन देखील करतात. तसेच काही कॅब ड्रायव्हरही असे कृत्य करत असल्याच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. आता दिल्लीतून अशीच एक घटना समोर आली आहे. एका चालकाचे विद्यार्थिनीसमोरच अश्लील कृत्य करत हस्तमैथून केलं. पोलिसांनी संबंधित प्रकरणात सोमवारी एफआरआय नोंदवून आरोपी चालक शंकरला बेड्या ठोकल्या आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : बाईचा नाद लय बेकार! नर्तिकेच्या नादी लागला उपसरपंच, जमीन जुमला अन् सोनं नाणं सारंच लुटलं, अखेर स्वत:च्याच डोक्यावर बंदुक...

नेमकं प्रकरण काय? 

संबंधित प्रकरणात, 22 वर्षीय पीडित विद्यार्थिनीही मूळची बंगळुरूची आहे आणि ती काश्मिरी गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेते आहे. ती दोन महिन्यांपूर्वी मॉडेल टाऊन परिसरातच भाडेतत्वार राहत होती. सोमवाली तिला विद्यापीठात जाण्यास उशीर झाल्याने तिनं अॅपवरून बुक केली. बुकिंगच्या दरम्यान, गाडी येण्यास 10 मिनिटांचा वेळ दाखवत होता. दरम्यान, कॅब ड्रायव्हरने शंकरने तिला अनेकदा फोन कॉल करूनही बुकींग रद्द करू नये अशी विनंती केली.

कॅबमध्येच करू लागला हस्तमैथून

पीडितेनं कॅबमधील धक्कादायक अनुभव सांगितला की, कॅबमध्ये बसेपर्यंत चालकाचे सामान्यच वर्तन होते. त्यानं पुढील सीटवर बसण्यास सांगितलं. विद्यार्थिनीने पुढे बसण्यास स्पष्टपणे नकार दिला होता आणि ती मागेच बसली. संभाषणादरम्यान, चालकाला कळाले की, ती दक्षिण भारतीय आहे. त्यानंतर त्याने विद्यार्थिनीसमोरच अश्लील कृत्य केलं. तिला अनेकदा स्पर्श करण्याचा प्रयत्न करत अश्लील बोलू लागला होता. तो एवढ्यावरच न थांबता कॅबमध्येच हस्तमैथून करू लागला.

तेव्हा विद्यार्थिनीने आवाज केला पण चालकाने वाहन थांबवलं नाही. काही अंतर कापल्यानंतर आरोपीने डीयू नॉर्थ या विद्यालयातील कॅम्पसमध्ये वाहन थांबवलं. त्यानंतर पीडित तरुणी तिथून बाहेर आली असता, तिथून तिनं पळ काढला. त्यानंतर तिने तिच्या ओळखीच्या लोकांना तिथं बोलावले आणि मित्रांसह पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची तक्रार दाखल दिली. संबंधित प्रकरणात पोलिसांनी कॅब ड्रायव्हर शंकरला अटक केली.

हे ही वाचा : 17 सप्टेंबरपासून बुधादित्य योगाची निर्माती होणार, काही राशीतील लोकांना मिळणार पैसाच पैसा

या तपासातून असे दिसून आले की, कॅबड्रायव्हर हा मलकागंजचा रहिवासी आहे. मॅरिसनगर पोलिसांनी शंकरची कॅब ताब्यात घेतली आणि फॉरेन्सिक आणि क्राइम टीमकडून त्याची तपासणी करून पुरावे गोळा केले.

    follow whatsapp