"सून पुरुषासारखी दिसते..." सासूचे 'ते' टोमणे अन् पतीने दिला तलाक! नंतर घरात घेण्याच्या बदल्यात केली 'ती' मागणी

एका विवाहितेने तिचा पती आणि सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी अत्याचार आणि तिच्या शरीराबद्दल विचित्र टोमणे मारल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

"सून पुरुषासारखी दिसते..." सासूचे 'ते' टोमणे अन् पतीने दिला तलाक!

"सून पुरुषासारखी दिसते..." सासूचे 'ते' टोमणे अन् पतीने दिला तलाक!

मुंबई तक

• 12:27 PM • 10 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सून पुरुषासारखी दिसत असल्याचे सासूचे टोमणे

point

पतीने दिला तलाक अन् घरात घेण्याच्या बदल्यात केली 'ती' मागणी

Crime News: उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एका विवाहितेने तिचा पती आणि सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी अत्याचार आणि तिच्या शरीराबद्दल विचित्र टोमणे मारल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पीडित विवाहितेने सासरच्या लोकांविरुद्धा तक्रार करत सांगितलं की, माझी सासू दररोज मला माझ्या घरातून हुंडा आण, असं म्हणायची. तसेच, मी बाईसारखी दिसत नसून माझं शरीर पुरुषासारखं असल्याचं मला माझी सासू टोमणे मारायची. याच गोष्टीमुळे पतीने मला तलाक दिला. आता मला परत घरात घेण्याच्या बदल्यात ते स्कॉर्पियो कारची मागणी करत आहेत. 

हे वाचलं का?

विवाहितेने सांगितलं की, तिने आपले वडील इतके पैसे देऊ शकत नसल्याचं सासरच्या लोकांना सांगितलं तेव्हा पीडितेला बंदिस्त करून तिला मारहाण करण्यात आली. पीडितेच्या घरच्यांना तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबद्दल कळताच ते लगेच पीडितेच्या माहेरी तिला घेऊन आले. पोलिसांकडे तक्रार केली असता त्यांनी काहीच मदत केली नसल्याचं तिने सांगितलं. आता कोर्टाच्या आदेशानुसार, ताजगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 

लग्नासाठी 15 लाख रुपये खर्च 

मिळालेल्या माहितीनुसार, नगला मेवातीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचं 11 नोव्हेंबर 2024 रोजी मंसूरीसोबत लग्न झालं होतं. पीडितेने केलेल्या तक्रारीवरून, त्यांच्या लग्नात 15 लाख रुपये खर्च झाला होता. तसेच, लग्नात दिलेल्या हुंड्यामुळे सासू नजरीन, सासरे शमीम आणि इतर कुटुंबीय समाधानी नव्हते. ते वारंवार पीडितेकडे हुंडा मागत होते. ते सूनेला आणखी हुंडा आण, असं म्हणत माझ्या आईवडिलांच्या घरी पाठवत होते.

हे ही वाचा: बहिणीचे प्रेमसंबंध कळताच भाऊ संतापला! प्रियकराला दांडक्याने बेदम मारहाण पण शेवटी... मुंबईतील धक्कादायक घटना

"पुरुषासारखी दिसते..." सासूचे टोमणे

पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सासरची मंडळी पीडितेच्या शरीरावरून सुद्धा तिला टोमणे मारत होते. सून पुरुषासारखी दिसते, असं सासू सतत म्हणायची. पीडितेची सासू आणि इतर कुटुंबियांनी पीडितेच्या या दोषाच्या बदल्यात स्कॉर्पिओ गाडी आणि दोन लाख रुपयांची मागणी केली. पीडिता म्हणाली, "सासरच्यांच्या मागणीला मी नकार दिल्यावर त्यांनी मला एका खोलीत बंदिस्त ठेवलं आणि मला रोज मारहाण करायला सुरुवात केली, मला उपाशी देखील ठेवण्यात आलं. कसं तरी माझ्या घरच्यांना याबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर माझ्या कुटुंबियांनी बुलंदशहर पोलिसांच्या मदतीने माझी सुटका केली."

हे ही वाचा: विवाहित महिलेसोबत होते प्रेमसंबंध! पतीला कळालं अन्... प्रियकराने गळा चिरून स्वत:ला संपवलं आणि नंतर...

नोटिस पाठवली अन् तलाक...

पीडितेने पोलिसांना सांगितलं की पतीने आधी त्याच्या वकिलामार्फत पत्नीला तीन वेळा तलाकच्या दोन नोटिसा पाठवल्या. त्यानंतर, 10 फेब्रुवारी 2025 रोजी, त्याने त्याच्या नातेवाईकांना साक्षीदार बनवून सर्वांच्या उपस्थितीत तीनदा तलाक दिला. तो म्हणाला की "आधी दोन लाख रुपये आणि एक स्कॉर्पिओ आण, मगच मी तुम्हाला ठेवतो." पीडितेनं पुढे असंही सांगितलं की पोलिसांनी तिची तक्रार ऐकली नसल्यामुळे ती कोर्टात गेली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून यासंदर्भात तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 

    follow whatsapp