Madha Lok Sabha : शरद पवारांना माढ्यात मिळाला उमेदवार, भाजपच्या विजयाचा मार्ग खडतर?

मुंबई तक

11 Apr 2024 (अपडेटेड: 11 Apr 2024, 05:36 PM)

Madha Lok Sabha election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलली...

शरद पवार आणि धैर्यशील मोहिते पाटील.

शरद पवार आणि धैर्यशील मोहिते पाटील.

follow google news

Madha lok Sabha election, Dhairyshil mohite patil, Sharad Pawar : माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लढतींपैकी एक ठरणार, हे निश्चित झाले आहे. धैर्यशील मोहित पाटील यांनी शरद पवार यांची आज (११ एप्रिल) भेट घेतली. धैर्यशील मोहिते पाटील हे १४ एप्रिल रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. शरद पवार यांनी ही पत्रकार परिषदेत माहिती दिली. १६ एप्रिल रोजी ते माढा लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. (Dhairyshil mohite patil will be contest madha lok sabha election from NCP Sharadchandra pawar party)

हे वाचलं का?

माढा लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, अशी माहिती दिली.

"धैर्यशील मोहिते आमच्यासोबत येत आहेत. अधिकृत कार्यक्रम दोन दिवसांनी आहे", असे शरद पवार म्हणाले. 

मोहिते पाटील १४ एप्रिल रोजी राष्ट्रवादीत कऱणार प्रवेश

शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रवेशाची माहिती दिली असली, तरी तारखेचा उल्लेख केलेला नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १४ एप्रिल रोजी प्रवेश करणार आहेत. अकलूज येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे.

हेही वाचा >> भाजपचे '400 पार'चे स्वप्न 'हे' 4 अडथळे करू शकतात भंग?

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीबद्दल शरद पवारांनी माहिती दिली नाही. पण, मिळालेल्या माहितीनुसार धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. धैर्यशील मोहिते पाटील हे १६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरू शकतात अशीही माहिती आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील

माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत होणार आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत.

हेही वाचा >> महाराष्ट्र भाजपला देणार आश्चर्याचा धक्का, नव्या ओपिनियन पोलचा कौल 

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. पण, तिकीट नाकारण्यात आल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांशी चर्चा सुरू केली होती. त्याबद्दलचा निर्णय आता झाला आहे. 

 

    follow whatsapp