Lok Sabha Election 2024 : भाजपचे '400 पार'चे स्वप्न 'हे' 4 अडथळे करू शकतात भंग?

मुंबई तक

BJP Lok Sabha election 2024, NDA target of 400 : भाजपच्या ४०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या मार्गात कोणते अडथळे उभे राहिले आहेत?

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह.
भाजपच्या ४०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या मार्गात कोणते अडथळे उभे राहिले आहेत?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक २०२४

point

भाजप समोर कोणती आव्हाने?

point

भाजपच्या ४०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या मार्गात अडथळे

Lok Sabha election 2024 : भाजप लोकसभा निवडणुकीत 370 जागा जिंकेल आणि एनडीए 400 पेक्षा जास्त जिंकणार, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी भाजप मित्रपक्षांना सोबत घेऊन कामही करत आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी भारतीय जनता पक्ष साम-दाम-दंड-भेड या सर्व धोरणांवर काम करत आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांचे लोक ज्या प्रकारे भाजपमध्ये सामील होत आहेत, त्यावरून देशाची संसद विरोधकहीन होईल, असे दिसत आहे. मात्र, काही आव्हानं आता भाजप प्रणित एनडीएसमोर उभी होताना दिसत आहे. हे प्रश्न सोडवण्यात पक्ष आतापर्यंत अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. (the last few days, some unwanted problems have suddenly come before the BJP.)

1) कर्नाटकातील लिंगायत धर्मगुरूंची केंद्रीय मंत्र्याविरोधात आघाडी

कर्नाटकच्या राजकारणात लिंगायत समाजातून भाजपला सगळ्यात मोठा जनाधार आहे. सुमारे 17 टक्के लोकसंख्या असलेला हा समाज भाजपवर नाराज असेल, तर कर्नाटकात पक्षाला अडचणींचा सामना करावा लागेल. 

राज्यातील लिंगायत समाजातील प्रमुख संत जगद्गुरू फकिरा डिंगलेश्वर महास्वामी यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलं आहे. 

प्रल्हाद जोशींनी महत्त्वाच्या लिंगायत नेत्यांची तिकिटे कापल्याच्या मुद्द्यावरून डिंगलेश्वर नाराज आहेत. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना तिकीट नाकारण्यात जोशी यांची भूमिका होती, असे त्यांचे म्हणणे आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp