42 वर्षीय पुरुषाचा 33 वर्षीय महिलेशी विवाह, हनीमूनच्या रात्रीच भलतंच घडलं
Crime news : पतीचे विवाहानंतर हनीमूनपूर्वीच निधन झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी रात्री नवऱ्याचा विवाह झाला होता. तो त्याच रात्री आपल्या वधूला नांदवण्यासाठी आपल्या घरी घेऊन आला. पहाटे 4 वाजताच्या सुमारास त्याच्या कुटुंबाने त्याला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हनीमूनच्या मध्यरात्री नवऱ्याचा मृत्यू
नेमकं घडलंय काय?
Crime news : पतीचे विवाहानंतर हनीमूनपूर्वीच निधन झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी रात्री नवऱ्याचा विवाह झाला होता. तो त्याच रात्री आपल्या वधूला नांदवण्यासाठी आपल्या घरी घेऊन आला. पहाटे 4 वाजताच्या सुमारास त्याच्या कुटुंबाने त्याला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या घटनेनं वधूलाही धक्का बसला. ज्या दिवशी त्याचा विवाह त्याच दिवशी मध्यरात्री नवऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली.
हे ही वाचा : महिलेचं बाहेर लफडं, पतीने तिला सोडलं अन् बॉयफ्रेंडला संपवण्यासाठी दिली खंडणी... हादरवून टाकणारं प्रकरण
प्रकरण काय?
नवऱ्याचे नाव परवेझ अली (वय 42) असे होते. परवेझ हा अमरोहच्या मोहल्ला नौगाझा येथील रहिवासी होता. त्याच्या आई वडिलांचे आधीच निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. तो त्याच्या भावासोबत पुस्तकांचे दुकान चालवत होता. त्याचे अलिकडेच बडा दरबार येथील रहिवासी मोहम्मद कादरी यांची मुलगी साईमा कादरीशी विवाह झाला होता. साईमाचे वय वर्षे हे 33 आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, परवेझने शनिवारी सायंकाळी 6 वाजता त्याच्या घरातून मोहल्ला नल नई बस्ती येथील नायब बँक्वेट हॉलपर्यंत लग्नाची वरात काढली होती. रविवारी परवेझ आणि सायमा यांचे लग्नाचे स्वागत समारंभही त्याच बँक्वेट हॉलमध्ये झाले.
हे ही वाचा : पत्नीचं बाहेर लफडं सुरु असल्याचा पतीला संशय, क्रिकेटच्या बॅटनेच केला प्राणघातक हल्ला, महिलेला जागेवरच केलं ठार
हनिमूनच्या मध्यरात्री नवऱ्याचा मृत्यू
पहाटे 1 वाजताच्या सुमारास, परवेझने वधूला निरोप दिला आणि तिला घरी घेऊन आला. लग्नानंतर घरात अनेक विधी सुरु झाले होते. नातेवाईकांसह कुटुंब आनंदीत होत. अचानकपणे पहाटे 4 वाजताच्या सुमारास, परवेझच्या छातीत अचानकपणे वेदना होऊ लागल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याच्या कुटुंबाने त्याला तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले, तोवर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.










