महिलेचं बाहेर प्रेमप्रकरण, पतीने तिला सोडलं अन् बॉयफ्रेंडला संपवण्यासाठी दिली खंडणी... हादरवून टाकणारं प्रकरण

मुंबई तक

extramarital affair : उत्तर प्रदेशच्या मऊ येथे राजेश सिंग नावाच्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या अवैध संबंधातून झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

extramarital affair
extramarital affair
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अवैध संबंधातून वाद चिघळला

point

पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक

extramarital affair : उत्तर प्रदेशच्या मऊ येथे राजेश सिंग नावाच्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाता तपास करत आहेत. आता पोलिसांनी या हत्येचा खळबळजनक खुलासा केला आहे. या प्रकरणात आरोपींचे एन्काऊंटर करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. राजेश सिंगची हत्या ही अवैध संबंधाच्या प्रकरणातून झाली होती, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.

हे ही वाचा : नांदेड हादरलं! घर माझ्या नावावर का करत नाहीस? सख्ख्या भावानेच सख्ख्या भावाला संपवलं

खंडणी देऊन राजेश सिंगची हत्या

राजेश सिंगचे राजेश यादवच्या पत्नीशी अवैध संबंध होते. याच अवैध संबंधामुळे राजेश यादवने आपल्या पत्नीला सोडून दिले होते. यामुळे राजेश यादव विरुद्ध द्वेष पसरला होता. राजेश यादवने खंडणी देऊन राजेश सिंगची हत्या केली आहे. संबंधित प्रकरण लक्षात घेणं गरजेचं आहे. 26 ऑक्टोबर रोजी मारेकऱ्यांनी राजेश सिंगवर गोळीबार करत हत्या केली. 

गुन्हेगाराच्या पायाला गोळी लागली आणि...

हत्या करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळाली की, मोहम्मदाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या असलपूरजवळ दोन गुन्हेगार दुचाकीवरून जात होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हेगारांवर घेराव घातला. या गोळीबारात एका गुन्हेगाराच्या पायाला गोळी लागली आणि त्यांना पोलिसांनी पकडले. त्यानंतर, पोलिसांनी दोन्ही गुन्हेगारांची चौकशी केली तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. 

पोलिसांवर गोळीबार

घटनेची माहिती देताना. मोहम्मदाबादच्या सीओ शीतल प्रसाद पांडे म्हणाल्या, पोलिसांना माहिती मिळाली की, शस्त्र बाळगून असलेले दोन पुरुष मोटारसायकलवरून येताना पाहून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. गुन्हेगार पळून जाऊ लागले आणि नंतर त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. एका गुन्हेगाराच्या पायाला गोळीबार लागल्याने दुसऱ्याने घटनास्थळावरून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा तो प्रयत्न कुठेतरी निष्फळ ठरल्याचे दिसून आले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp