राजधानी दिल्ली हादरली.. लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटात तब्बल 10 जणांचा मृत्यू, मुंबईत हायअलर्ट जारी

मुंबई तक

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोट झाला असून यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर कारला आग लागली.

ADVERTISEMENT

8 killed in powerful explosion in a car near red fort in delhi nsg and nia teams dispatched high alert issued in mumbai
लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटात तब्बल 8 जणांचा मृत्यू, मुंबईत हायअलर्ट
social share
google news

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशननजीक एका इको व्हॅनमध्ये काही वेळापूर्वीच शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटानंतर संपूर्ण परिसरात एकच घबराट पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले असल्याचे समजते आहे. दरम्यान, या स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. दरम्यान, या घटनेनंतर NIA चं पथक हे घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.

दिल्लीत स्फोट, मुंबईत हायअलर्ट जारी!

दरम्यान, या भीषण स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीतील स्फोटाची माहिती समोर येताच मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी गस्त वाढवली असून. ठिकठिकाणी तपासणी देखील सुरू केली आहे. 

सध्या मुंबईत देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाकाबंदी करण्याचे देखील पोलिसांना आदेश देण्यात 
आले आहेत. संशयास्पद व्यक्तींची तपासणी करण्याचे देखील आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. यासाठी ग्राउंड इंटेलिजेंस नेटवर्कचा वापर करण्यात आली आहे.तसंच संवेदनशील भागात गस्त वाढवण्यात आली आहे.
 

नेमकं काय घडलं?

आज (10 नोव्हेंबर) संध्याकाळी 6.55 वाजता अग्निशमन दलाला स्फोटाची माहिती मिळाली. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांचे पथक देखील तात्काळ घटनास्थळी रवाना झालं आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. स्फोटाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी फॉरेन्सिक आणि तांत्रिक तज्ज्ञ देखील घटनास्थळी पोहोचले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp