Delhi Blast: लाल किल्ला कार स्फोटानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया, पाहा ट्वीटमध्ये नेमकं काय

मुंबई तक

Rahul Gandhi Tweet: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लाला किल्ला स्फोटाबाबत ट्वीटवरून आपली प्रतिक्रिया दिली. ज्यामध्ये त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांविषयी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

ADVERTISEMENT

delhi blast rahul gandhi reaction after red fort car blast see what exactly is in tweet
Delhi Blast
social share
google news

नवी दिल्ली: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ आज (10 नोव्हेंबर) घडलेल्या भीषण कार स्फोट प्रकरणावर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र शोक आणि चिंता व्यक्त केली आहे. या दुर्दैवी घटनेत अनेक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समजते, ज्यामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणावर आपली संवेदना व्यक्त केली आहे.

राहुल गांधींचे ट्विट

"दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार स्फोटाची बातमी अत्यंत दुःखद आणि चिंताजनक आहे. या दुःखद घटनेत अनेक निरपराध लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते, जे मनाला व्यथित करणारे आहे.'  

'या दुःखाच्या प्रसंगी आपल्या प्रियजनांना गमावलेल्या शोकसंतप्त कुटुंबीयांबरोबर मी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांना माझ्या संवेदना व्यक्त करतो. सर्व जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो." असं ट्वीट राहुल गांधींनी केली आहे.

घटनेची पार्श्वभूमी

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील गेट नंबर 1 जवळ आज संध्याकाळी सुमारे 6.52 वाजता एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात सध्या तरी 10 जणांचा मृत्यू झाल्याचे आणि 24 हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्फोट इतका प्रचंड होता की त्यामुळे जवळच्या वाहनांना आग लागली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp