दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला? कारच्या उडाल्या ठिकऱ्या, 5 महत्त्वाच्या अपडेट्स समोर
Delhi Blast Update : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. हा दहशतवादी हल्ला तर नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दिल्लीत स्फोट कधी झाला?
दिल्लीत हाय अलर्ट
Delhi Blast Update : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. हा दहशतवादी हल्ला तर नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हा धक्कादायक स्फोट 11 नोव्हेंबर रोजी सोमवारी सायंकाळी 6:55 वाजता घडला आहे. याच स्फोटाबाबत एक महत्त्वाच्या पाच अपडेट्स समोर आलेल्या आहेत.
हे ही वाचा : राजधानीत दिल्लीत स्फोट, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनेचा थरार, म्हणाले, 'मी असा स्फोट उभ्या आयुष्यात कधीच...'
स्फोट कधी झाला?
लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनजवळ गेट क्रमांक 1 येथे उभ्या असलेल्या कारचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटानंतर आगडोंब उसळला आहे. जवळपास तीन ते चार वाहनांना आग लागली आहे. प्राथमिक तपासातून, दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी सांगितलं की, सायंकाळी 6:52 वाजता एक कार जात असताना, लाल दिव्याजवळ थांबली आणि त्याचक्षणी स्फोट झाला.
मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता
आतापर्यंत या स्फोटात मृतांची संख्या ही 10 असल्याचे सांगण्यात येत आहे. या मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच जखमींची संख्या ही 24 वर गेली आहे. जखमींना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट इतका भीषण होता की, रस्त्यांवरील पथदव्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे.










