राजधानी दिल्लीत स्फोट, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनेचा थरार, म्हणाले, 'मी असा स्फोट उभ्या आयुष्यात कधीच...'
Delhi Blast : देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट झाला आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच घबराट पसरली आहे. या स्फोट इतका गंभीर होता की, जवळपास पाच ते सहा वाहने उद्ध्वस्त झाल्याचे चित्र समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दिल्ली स्फोटात 8 जणांचा मृत्यू
प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनेचा थरार
Delhi Blast : देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट झाला आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच घबराट पसरली आहे. हा स्फोट इतका गंभीर होता की, जवळपास पाच ते सहा वाहने उद्ध्वस्त झाल्याचे चित्र समोर आले आहे. या स्फोटात परिरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना 10 नोव्हेंबर रोजी सोमवारी घडली असून या भीषण स्फोटामुळे आता दिल्ली हादरून गेली आहे.
हे ही वाचा : राजधानी दिल्ली हादरली.. लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटात तब्बल 8 जणांचा मृत्यू, मुंबईत हायअलर्ट जारी
स्फोटात 8 जणांचा मृत्यू
या स्फोटाने धुराचे लोट पसरले असून 8 लोकांनी आपला जीव गमावला आहे. मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ हा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी उपस्थितांनी सांगितलं की, स्फोट इतका भीषण होता की, ज्यात इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. मी जेव्हा दुकानात बसलो होतो तेव्हा अचानकपणे इतका मोठा स्फोट झाला की, मी खुर्चीवरून खाली कोसळलो. माझ्या आय़ुष्यात इतका मोठा स्फोट कधीच अनुभवला नव्हता.
प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनेचा थरार
दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, राजधर पांडे म्हणाले की, 'ते घरी होते आणि जेव्हा ते छतावर गेले तेव्हा त्यांना आकाशात आगडोंब उसळलेला पाहिला. आग भीषण असल्याने सर्वत्र एकच गोंधळ उडाला
हे ही वाचा : शाळा, कुस्ती मैदान ते भाजी मार्केट अशोक चव्हाणांचा नांदेडमध्ये मोठा जमीन घोटाळा, शिंदेंच्या आमदाराचे सनसनाटी आरोप










