Delhi Car Blast: स्फोट झाला 'त्या' कारचा मालक सापडला, नावही आलं समोर...

मुंबई तक

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या मोठ्या कार स्फोटाच्या तपासाने आता वेग घेतला आहे. या स्फोटात वापरलेल्या कारचा नेमका मालक कोण हे समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

delhi car blast owner of exploded i20 hyundai car found name also revealed
फोटो सौजन्य: रॉयटर्स
social share
google news

नवी दिल्ली: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या मोठ्या कार स्फोटाचा तपास आता अधिक वेगवान झाला आहे. ज्या कारमध्ये स्फोटा झाला ती i20 Hyundai कार ज्या व्यक्तीच्या नावावर नोंदणी होती त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याचं नावही समोर आलं आहे. ही कार हरियाणातील मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत असल्याचं समोर आलं आहे. ही माहिती समोर येताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कार मालक मोहम्मद सलमानला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरू आहे.

कारचा मालक पोलिसांच्या ताब्यात

तथापि, प्राथमिक चौकशीदरम्यान मोहम्मद सलमानने पोलिसांना सांगितले की, त्याने ही कार दुसऱ्याला विकली होती. पोलीस पथकं आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी (RTO) संपर्क साधून कारच्या खऱ्या मालकाचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा>> Delhi Blast: लाल किल्ला कार स्फोटानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया, पाहा ट्वीटमध्ये नेमकं काय

स्फोटाच्या वेळी कार कोणाच्या ताब्यात होती आणि तिचा खरा मालक हे निश्चित करण्यासाठी कारच्या विक्री आणि हस्तांतरणाच्या तपशीलांना RTO रेकॉर्डशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

स्फोटामागील कट उलगडण्यासाठी आणि खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस कारच्या सध्याच्या मालकाची अचूक ओळख पटवण्याचा सध्या प्रयत्न करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp