सगळंच संशयास्पद! निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, आमदार रोहित पवारांची मागणी; नेमकं काय घडलं?

Rohit Pawar on Election Commission : "पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली, तर अनेक ठिकाणी EVM वरील वेळ सुमारे 15 मिनिटे उशिराची दाखवली जातेय, काही ठिकाणी तिसऱ्या उमेदवाराला मत दिल्याचं बटन दाबल्यानंतर लाईट लागते, काही ठिकाणी शेवटचं (चौथं) बटन दाबल्यानंतर आवाज येतो पण लाईट लागत नाही", असं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय.

Rohit Pawar

Rohit Pawar

मुंबई तक

15 Jan 2026 (अपडेटेड: 15 Jan 2026, 11:18 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यभरात अनेक ठिकाणी ईव्हिएम मशीन बंद पडल्याचे प्रकार

point

आता रोहित पवारांची आयोगाकडे मोठी मागणी

Rohit Pawar on Election Commission : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज (दि. 15) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, काही ठिकाणी ईव्हीएम मशीन सुरु होत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संशय व्यक्त केलाय. शिवाय त्यांनी निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी केलीय. रोहित पवार नेमकं काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात... 

हे वाचलं का?

हेही वाचा : BMC Elections 2026 LIVE Update: मतदानाची वेळ उलटून एक तास उलटला तरीही, ईव्हिएम मशीन सुरु होईनात; कुठं सुरुय गोंधळ?

रोहित पवार काय म्हणाले? 

रोहित पवार म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली, तर अनेक ठिकाणी EVM वरील वेळ सुमारे 15 मिनिटे उशिराची दाखवली जातेय, काही ठिकाणी तिसऱ्या उमेदवाराला मत दिल्याचं बटन दाबल्यानंतर लाईट लागते, काही ठिकाणी शेवटचं (चौथं) बटन दाबल्यानंतर आवाज येतो पण लाईट लागत नाही.. एकूणच हे सगळंच संशयास्पद आणि निवडणुकीबाबत अविश्वास निर्माण करणारं आहे. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण देऊन हा गोंधळ तातडीने दूर करावा आणि मतदान हे मुक्त व निर्भय वातावरणासह मत दिलेल्या उमेदवारांनाच ते गेलं पाहिजे, याची काळजी घ्यावी.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली, तर अनेक ठिकाणी EVM वरील वेळ सुमारे १५ मिनिटे उशिराची दाखवली जातेय, काही ठिकाणी तिसऱ्या उमेदवाराला मत दिल्याचं बटन दाबल्यानंतर लाईट लागते, काही ठिकाणी शेवटचं (चौथं) बटन दाबल्यानंतर आवाज येतो पण लाईट लागत…

— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 15, 2026

 


जळगावमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत मशीनचा क्रम बदलला !

जळगाव शहरात मतदान सुरू होण्यापूर्वी एका मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक 15 येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मांडणीचा क्रम चुकल्याचा आरोप उमेदवार प्रतिनिधींनी केला. ईव्हीएम मशीनचा मांडणीचा क्रम नियमांनुसार नसल्याने तो तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी उमेदवार प्रतिनिधींनी केली. यावरून निवडणूक कर्मचारी आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळाने निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत उमेदवार प्रतिनिधींची मागणी मान्य केली आणि ईव्हीएम मशीनचा क्रम पुन्हा योग्य पद्धतीने लावण्यात आला. दरम्यान, मशीनचा क्रम तसेच पोलिंग एजंटला बसण्याची योग्य व्यवस्था नसल्याबाबतही उमेदवार प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. उमेदवार प्रतिनिधींची मागणी केल्यानंतर वातावरण शांत झाले.
 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

BMC Elections 2026 LIVE Update: मतदानाची वेळ उलटून एक तास उलटला तरीही, ईव्हिएम मशीन सुरु होईनात; कुठं सुरुय गोंधळ?

    follow whatsapp