Hardik Pandya आणि Mahika Sharma विरोधात पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

12 Mar 2026 (अपडेटेड: 12 Mar 2026, 09:27 AM)

Hardik Pandya and Mahika Sharma : मिळालेल्या माहितीनुसार, ॲडव्होकेट वाजेद खान यांनी हार्दिक पंड्याविरोधात ही तक्रार नोंदवली आहे. टी-20 विश्वचषक विजयाचा जल्लोष साजरा करताना हार्दिक पंड्याने अंगावर तिरंगा परिधान केला होता. मात्र, तो परिधान करण्याच्या पद्धतीमुळे किंवा त्यावेळच्या विशिष्ट कृतीमुळे भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान झाला असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

Hardik Pandya and Mahika Sharma

Hardik Pandya and Mahika Sharma

Google CTA

बातम्या हायलाइट

point

Hardik Pandya आणि Mahika Sharma विरोधात पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

point

राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप

Hardik Pandya and Mahika Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हार्दिक पंड्याविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून, यामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील विजयानंतर हार्दिकने केलेल्या एका कृतीमुळे राष्ट्रीय ध्वजाचा अवमान झाला असल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. पुण्यातील एका वकिलाने हा तक्रार अर्ज दिला असून पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, ॲडव्होकेट वाजेद खान यांनी हार्दिक पंड्याविरोधात ही तक्रार नोंदवली आहे. टी-20 विश्वचषक विजयाचा जल्लोष साजरा करताना हार्दिक पंड्याने अंगावर तिरंगा परिधान केला होता. मात्र, तो परिधान करण्याच्या पद्धतीमुळे किंवा त्यावेळच्या विशिष्ट कृतीमुळे भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान झाला असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. वाजेद खान यांनी आपल्या अर्जात स्पष्टपणे नमूद केले आहे की, हार्दिक पंड्याची ही कृती राष्ट्रीय अस्मितेचा अपमान करणारी आहे, त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.

हेही वाचा : 16 मार्चपासून महालक्ष्मी राजयोग! 'या' 3 राशींवर होणार धनवर्षाव, जुने वादही मिटणार; तुमची रास यात आहे का?

या गंभीर प्रकरणात 'प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट 1971' अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदार वकिलाने केवळ अर्जच दिला नाही, तर पुराव्यासाठी संबंधित घटनेच्या व्हिडिओ क्लिप्सदेखील शिवाजीनगर पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत. या व्हिडिओ क्लिप्सच्या आधारे हार्दिक पंड्याने नेमका कसा अवमान केला, हे स्पष्ट होत असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. आता पोलीस या पुराव्यांची तांत्रिक बाजू तपासून पाहत आहेत.

सध्या शिवाजीनगर पोलिसांनी हार्दिक पंड्याविरोधातील या तक्रार अर्जाची पडताळणी सुरू केली आहे. सादर करण्यात आलेले पुरावे आणि कायद्यातील तरतुदी यांचा विचार करून पुढील तपासाची दिशा ठरवली जाणार आहे. विश्वचषक विजयाचा नायक ठरलेल्या हार्दिक पंड्याभोवती आता या कायदेशीर तक्रारीमुळे वादाचे वलय निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी पूर्ण केल्यानंतरच यावर पुढील कोणती ठोस कारवाई होणार का, हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आठवीचा मुलाला शाळेतून घरी परतताना तिघांनी घेरलं, एकाने चाकूने केले वार, वडिलांनी सांगितला घटनेचा थरार