BMC Elections 2026 LIVE Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत किती टक्के मतदान? पाहा, लाईव्ह अपडेट्स...
LIVE Maharashtra BMC Elections 2026: मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 साठी आज (15 जानेवारी) मतदान पार पडत आहे. मुंबईतील मतदानाबाबतच्या प्रत्येक घडामोडी आपल्याला या लाइव्ह ब्लॉगमध्ये पाहता येईल.
ADVERTISEMENT

BMC Elections 2026 LIVE Update
▌
बातम्या हायलाइट
मतदानाची वेळ उलटून एक तास उलटला तरीही
ईव्हिएम मशीन सुरु होईनात; कुठं सुरुय गोंधळ?
LIVE Updates Mumbai BMC Elections 2026: मुंबई महानगरपालिका (BMC) च्या दीर्घप्रतीक्षित सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता मतदान सुरू झालं आहे. आज गुरुवार (15 जानेवारी 2026) रोजी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मुंबईतील 227 प्रभागांमध्ये मतदान होणार आहे. राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होत असून, यामध्ये मुंबईची निवडणूक सर्वात महत्त्वाची मानली जात आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे LIVE UPDATE:
- जळगाव शहर महानगरपालिका
सकाळी 11. 30 पर्यंत मतदानाची टक्केवारी: 13.39 टक्के
- जळगाव शहराच्या आर. आर. विद्यालयात बोगस मतदानाच्या आरोपातून गोंधळाचे वातावरण! प्रभाग क्रमांक ५ अ मध्ये बोगस व दुबार मतदार येत असल्याचे आरोप, प्रभाग पाच अ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा माजी उपमहापौर विष्णू भंगाळे आणि अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांच्यात थेट लढत
- बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक
सकाळी 11.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : 17.73 टक्के










