देशात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनाची लस घेतली. याशिवाय काही सेलिब्रिटींनीही कोरोनाची लस घेण्यास पुढाकार घेतलाय. मंगळवारी अभिनेते कमल हसन यांनी लस घेतली. चेन्नईमध्ये त्यांनी लसीचा पहिला डोस घेतला.
ADVERTISEMENT
तर नुकतंच अभिनेते सतीश शहा यांनीही कोरोनाची लस घेतली आहे. लस घेतल्यानंतर अभिनेते सतीश यांनी त्यांना आलेला अनुभव ट्विटरवरून शेअर केलाय. सतीश त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “लस घेण्यासाठी मी 3 तास रांगेत उभा होतो. लसीकरण केंद्राबाहेर थोडासा गोंधळ होता. मात्र आतमध्ये सर्व काही व्यवस्थित होतं. तसंच व्हीआयपी एन्ट्रीचा वापर न केल्याने मला थोडासा ओरडाही खावा लागलाय.”
यानंतर बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनी कोरोनाची लस घेतली असून फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. राकेश रोशन यांनी ट्विटरच्या माध्यमातून कोरोनाची लस घेतली असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी ट्वीट करत ‘कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे’ असं म्हटलंय.
दरम्यान अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ही पहिल्या भारतीय अभिनेत्री जिने कोरोना लस घेतली होती. शिल्पाने इन्स्टाग्रामवरून एक फोटो शेअर करत ही माहिती दिली होती. शिल्पाने दुबईत कोरोनाची लस घेतली होती.
ADVERTISEMENT
