"पापाचा घडा भरला होता, पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं होतं...", लेफ्टनंट जनरल म्हणाले आरपारची तयारी होती

राजीव घई म्हणाले की आम्ही तयार आहोत. आमची हवाई संरक्षण यंत्रणा देखील सज्ज होती. आपली हवाई संरक्षण यंत्रणा भिंतीसारखी उभी होती.

Mumbai Tak

मुंबई तक

12 May 2025 (अपडेटेड: 12 May 2025, 04:20 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तिन्ही सैन्यदलांची होती आरपारची तयारी

point

पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारतानं कसं परतवलं?

point

लेफ्टनंट जनरल राजीव घई काय म्हणाले?

भारताच्या तिन्ही सैन्यदलांची संयुक्त पत्रकार परिषद आज पार पडली. ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. भारतीय सैन्यातील लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक (DGMO) लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले,  आमची हवाई संरक्षण प्रणाली सज्ज असल्याचं दाखवून दिलंय. त्यामुळेच पाकिस्तान आपल्या हवाई संरक्षण ग्रिड सिस्टीममध्ये प्रवेश करू शकला नाही.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Operation Sindoor मधून भारतानं नेमकं काय साध्य केलं? जाणून घ्या महत्वाचे 12 मुद्दे

पत्रकार परिषदेत बोलताना राजीव घई यांनी सांगितलं की, दहशतवादी घटनांच्या पद्धतींमध्ये बदल होतायत. आपल्या सैन्यासोबतच, निष्पाप नागरिकांवरही हल्ले होत होते. 2024 मध्ये जम्मूतील शिवखोरी मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंवर झालेले हल्ले आणि या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेले हल्ले ही या धोकादायक प्रवृत्तीची विशिष्ट उदाहरणे आहेत. पहलगाम येईपर्यंत पापाचे हे घडे भरलेरे होते. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं. आम्हाला पूर्ण कल्पना होती की पाकिस्तान देखील हल्ला करेल, म्हणून आम्ही आमच्या ह1वाई संरक्षणाची पूर्ण तयारी केली होती.

राजीव घई म्हणाले की आम्ही तयार आहोत. आमची हवाई संरक्षण यंत्रणा देखील सज्ज होती. आपली हवाई संरक्षण यंत्रणा भिंतीसारखी उभी होती. हल्ल्याला तोंड देण्यासाठी आम्ही तयारी केलेली होती. आम्ही टार्गेटपर्यंत पोहोचणार हे आम्हाला माहिती होतं. 

हे ही वाचा >> पाकिस्तानमध्ये तब्बल 51 ठिकाणी हल्ले, बलोच आर्मीने म्हटलं आता आम्ही...

दरम्यान, एअर ऑपरेशन्सचे महासंचालक एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, आमची लढाई दहशतवादाविरुद्ध आणि दहशतवाद्यांशी आहे. म्हणूनच आम्ही 7 मे रोजी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला पण दुर्दैवाने पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना पाठिंबा देणं योग्य मानलं आणि या लढाईला स्वतःची लढाई बनवलं. या परिस्थितीत, आमची प्रत्युत्तराची कारवाई अत्यंत आवश्यक होती, त्यात काहीही नुकसान झालं तरी ती करावी लागणार होती. त्यामुळे याला पाकिस्तान जबाबदार आहे. 

दरम्यान, त्यांनी सांगितले की, आम्ही सीमा न ओलांडता हल्ले केले. आम्ही पाकिस्तानची क्षेपणास्त्रे पाडली. ते आमच्या हवाई संरक्षण ग्रिडमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. आम्ही दहशतवाद्यांवर अचूक हल्ले केले. लेफ्टनंट घई म्हणाले की, 9-10  मे च्या रात्री पाकिस्तानी हवाई दलाने आमच्या हवाई दलावर आणि लॉजिस्टिक्स आस्थापनावर हल्ला केला, त्याला आम्ही जशास तसं उत्तर दिलं.

    follow whatsapp