Loksabha speaker no confidence motion : एकीकडे महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा असताना दिल्लीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांनी एक वेगळीच खेळी केल्याचे पहायला मिळाले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांच्या सह्या असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके, अमर काळे आणि भास्कर भगरे या तिघांनी अविश्वास ठरावार स्वाक्षरी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, या अविश्वास प्रस्तावावर निर्णय होईपर्यंत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभेत न येण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : रोहित पवारांचे एका मागोमाग एक भयंकर गौप्यस्फोट, 'अजितदादांचा अपघात नाही तर...'
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदांरांच्या सह्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधींना राष्ट्रपती अभिभाषणावरील आभार प्रदर्शानात बोलू न दिल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात काँग्रेसने अविश्वासाचा प्रस्ताव आणला आहे. यावर जवळपास ११८ खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांनी देखील यावर स्वाक्षऱ्या केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या अविश्वास प्रस्तावावर निलेश लंके, अमर काळे आणि भास्कर भगरे या शरद पवार गटाच्या खासदारांच्या सह्या आहेत. राज्यात एकीकडे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनिकरणाची चर्चा असतानाच शरद पवार गटाच्या खासदारांनी या प्रस्तावावर सह्या केल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
अविश्वास प्रस्ताव कशासाठी?
संसदेत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याचा मुद्दा आधार मानून विरोधकांनी हा अविश्वास प्रस्ताव आणला आहे. लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव अनुच्छेद 94 (सी) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांच्या नेतृत्त्वात या प्रस्तावाची सूचना दाखल करण्यात आली.
हे ही वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मंत्रिमंडळातील पहिलीच बैठक, अजितदादांच्या 'त्या' तीन मागण्यांना मंजुरी
ओम बिर्ला लोकसभेत येणार नाहीत
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्याविरुद्ध विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर निर्णय होईपर्यंत सभागृहात न येण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जोपर्यंत त्यांना पदावरून हटवण्याच्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा आणि त्यावर निर्णय होत नाही, तोपर्यंत ते लोकसभेच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत. जरी संसदीय नियमांमध्ये अशी कोणतीही सक्ती नसली, तरीही ओम बिर्ला यांनी स्वतः सभागृहात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, सरकार किंवा विरोधकांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, परंतु त्यांनी आपला निर्णय स्पष्ट केला आहे की ते सभागृहात उपस्थित राहणार नाहीत.
ADVERTISEMENT











