शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी दिली माहिती

मुंबई तक

14 Feb 2026 (अपडेटेड: 14 Feb 2026, 11:49 AM)

Sharad Pawar Health Update : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना खोकल्याच्या त्रासामुळे आणि ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर 9 फेब्रुवारी पासून उपचार सुरु होते. दरम्यान, आता त्यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात येणार आहे. रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी ही माहिती दिली. शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून ते बरे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच त्यांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Sharad Pawar Health Update

Sharad Pawar Health Update

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

point

डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी दिली माहिती

Sharad Pawar Health Update : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना खोकल्याच्या त्रासामुळे आणि ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर 9 फेब्रुवारी पासून उपचार सुरु होते. दरम्यान, आता त्यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात येणार आहे. रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी ही माहिती दिली. शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून ते बरे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच त्यांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : केरळची सर्वात लहान organ donor; 10 महिन्यांची चिमुकली 5 जणांचा जीव वाचवणार!

शरद पवारांच्या प्रकृतीविषयी काय म्हणाले डॉक्टर?

शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत होता. तसेच त्यांना तापही आला होता. 9 फेब्रुवारी पासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुबी हॉल क्लिनीकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी सांगितले की, 'शरद पवारांना आज डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते बरे झाले आहेत. त्यांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर ते हळूहळू त्यांचे दैनंदिन काम आणि सार्वजनिक कार्यक्रम पुन्हा सुरु करु शकतील.'

सहा दिवस रुग्णालयात 

जिल्हा परिषद निवडणूक निकालाच्या दिवशीच शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या काही प्राथमिक चाचण्या करण्यात आल्या. यावेळी रुग्णसेवेत अडथळा येऊ नये यासाठी पवार यांच्या कार्यकर्त्यांनी परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन रुग्णालयातर्फे करण्यात आले होते. 

हे ही वाचा : मुंबई: मॅट्रिमोनियल साइटवर पाठवली रिक्वेस्ट; IPS अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचा दावा अन्... घटस्फोटित महिलेसोबत केलं नको ते

पवार कधी सक्रिय होणार?

शरद पवार यांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला असला तरी ते सार्वजनिक कार्यक्रमात कधी सक्रिय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.