Operation Sindoor मधून भारतानं नेमकं काय साध्य केलं? जाणून घ्या महत्वाचे 12 मुद्दे

मुंबई तक

ऑपरेशन सिंदूरने हा संदेश दिला की, दहशतवादाला सरकार पुरस्कृत धोरण म्हणून खपवून घेतलं जाणार नाही. तसंच भारताने नियंत्रित पद्धतीनं कारवाई करुन सामर्थ्य दाखवून दिलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑपरेशन सिंदूरमधून भारतानं काय साध्य केलं?

point

12 मुद्द्यांमध्ये समजून घ्या ऑपरेशन सिंदूरचं यश

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले केले. पहलगाममध्ये झालेल्या निष्पाप पर्यटकांवरील हल्ल्याला भारतानं आक्रमक होत उत्तर दिलं. अनेक तास दोन्ही देशांमध्ये हल्ले प्रतिहल्ले झाले. मात्र, नंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीला सहमती दर्शवली. मात्र, एकूणच या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरमधून भारतानं काय साध्य केलं असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. जागतिक स्तरावर असो किंवा काश्मीर तसंच दहशतवादाचा प्रश्न असो. भारतानं या ऑपरेशनमधून मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. 

नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त

भारताने पाकिस्तान आणि PoK मधील 9 महत्त्वाचे दहशतवादी तळ नष्ट केले. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित हे तळ भारताविरुद्ध हल्ल्यांच्या नियोजनाचे  केंद्र होते.

पाकिस्तानच्या आत घुसून हल्ले

भारताने दहशतवाद्यांसोबतच  त्यांना समर्थन देणाऱ्यांवरही निशाणा साधला. हल्ले PoK पुरते मर्यादित न ठेवता पाकिस्तानच्या पंजाब प्रांतासह शेकडो किलोमीटर आत भारताने हल्ले केले. बहावलपूरसारख्या संवेदनशील ठिकाणांवरही हल्ले झाले. तिथे अमेरिकेनंही ड्रोन हल्ले केले नव्हते. भारतानं दे दाखवून दिलं की, आम्ही ठरवल्यास सगळा पाकिस्तान आमच्या निशाण्यावर ठेवू शकतो. 
 

हे ही वाचा >> दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल आज होणार जाहीर? वेळ काय असेल, जाणून घ्या एका क्लिकवर

लाल रेषा आखली

ऑपरेशन सिंदूरने हा संदेश दिला की, दहशतवादाला सरकार पुरस्कृत धोरण म्हणून खपवून घेतलं जाणार नाही. तसंच भारताने नियंत्रित पद्धतीनं कारवाई करुन सामर्थ्य दाखवून दिलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp