पीएम मोदी अन् अमित शाहांना टॅग करत रोहित पवारांची पोस्ट, अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी मागणी

Rohit Pawar on death of Ajit Pawar : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीतील विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मात्र हा अपघात नसून यामागे घातपात असण्याची शंका अनेकांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी 10 फेब्रुवारी रोजी अपघाताविषयी शंका व्यक्त करणारे एक प्रेझेंटशन दिले. यामध्ये त्यांनी व्हीएसआर या विमान कंपनीविषयी अनेक धक्कादायक दावे केले. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी वारंवार शंका व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, आज रोहित पवार यांनी एक्सवर ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. विमान कंपनीच्या मालकालर कारवाई करायला सरकार का घाबरत आहे? असा सवाल त्यांनी विचारला आहे. यासोबतच या विमान कंपनीवर तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. रोहित पवार यांची मागणी नेमकी काय आहे, जाणून घेऊया.

rohit pawar on death of ajit pawar

rohit pawar on death of ajit pawar

मुंबई तक

• 11:42 AM • 13 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पीएम मोदी अन् अमित शाहांना टॅग करत रोहित पवारांची पोस्ट

point

अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी मागणी

Rohit Pawar on death of Ajit Pawar : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीतील विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मात्र हा अपघात नसून यामागे घातपात असण्याची शंका अनेकांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी 10 फेब्रुवारी रोजी अपघाताविषयी शंका व्यक्त करणारे एक प्रेझेंटशन दिले. यामध्ये त्यांनी व्हीएसआर या विमान कंपनीविषयी अनेक धक्कादायक दावे केले. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी वारंवार शंका व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, आज रोहित पवार यांनी एक्सवर ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. विमान कंपनीच्या मालकालर कारवाई करायला सरकार का घाबरत आहे? असा सवाल त्यांनी विचारला आहे. यासोबतच या विमान कंपनीवर तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. रोहित पवार यांची मागणी नेमकी काय आहे, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा : कांद्याच्या पिकात अफूची लागवड, उपतालुका प्रमुखाचा प्रताप समोर येताच ओमराजे निंबाळकरांचा मोठा निर्णय

'सरकार विमान कंपनीवर कारवाईला का घाबरत आहे?'

अजित पवार यांच्या ज्या विमानाचा अपघात झाला ते व्हीएसआर या कंपनीचे होते. या कंपनीवर कारवाई करायला सरकार का घाबरत आहे असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. एक्सवर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, 'निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लीस्ट केलं जातं.. चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय VSR कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळंही लावायला पाहिजे होतं. पण तसं होताना का दिसत नाही, हे न समजणार कोडं आहे.. की कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का, ज्यामुळं सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतं?'

'कंपनीवर तात्काळ बंदी घालावी'

या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी कंपनीवर तात्काळ कारवाई करण्याची विनंती सरकारला केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, 'देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी, सर्वपक्षीय राजकीय नेते या VSR कंपनीची सेवा घेत असतील तर त्यांचा आणि पायलटसह अन्य कर्मचाऱ्यांचाही जीव तेवढाच महत्त्वाचा नाही का? त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, तातडीने या कंपनीवर कारवाई करून तिच्या देशातील सेवेला बंदी घालावी.'  

हे ही वाचा : आहिल्यानगर : वर्गशिक्षकाकडून 4 विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार, नराधम न्यायालयाजवळ पोहोचताच महिलांनी झोडपलं

अमोल मिटकरींवर पक्षाचे वरिष्ठ नाराज?

अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांचा घातपात झाल्याची शंका वारंवार व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्यावर पक्षातील वरिष्ठ नेते नाराज असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या होत्या. मात्र ह्या पेड न्यूज असून पक्षातील वरिष्ठ नाराज नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. एक्सवर ट्विट करत मिटकरी म्हणाले की, 'माझ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांची फळी मी आदरणीय दादांच्या घातपाताचा संशय व्यक्त केल्याने नाराज असल्याची पेड न्यूज़ जाणीवपूर्वक चालवल्या गेली आहे. वरिष्ठ नेत्यानी सुद्धा हीच मागणी केली आहे त्यांची नाराजी असण्याचं कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा या कठीण काळात एकसंघच आहे. मला हा प्रश्न का विचारलाय असा कुणी फोनकरून नाराजी व्यक्त केलेली नाही.सत्य प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. माझ्या नावाने पेड न्यूज पसरवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मी कोणावरही बिनबुडाचे आरोप केलेले नाहीत आणि करणारही नाही. माझी भूमिका स्पष्ट, पारदर्शक आणि जनतेसमोर आहे. अफवा पसरवणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल.दादांच्या अकाली जाण्याची सत्यता जनतेसमोर आलीच पाहिजे त्यासाठी माझा लढा कायम राहील. आणी माझा पक्ष व पक्षातील वरिष्ठ फळीतील नेते माझ्या पाठीशी राहतील याबाबत माझ्या मनात दुमत नाही.' 
 
    follow whatsapp