विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये सचिनचा रेकॉर्ड तोडण्याची होती संधी 

Virat Kohli Retired : विराट कोहलीने निवृत्ती जाहीर केली नसती तर सचिन तेंडुलकरचा मोडला असता रेकॉर्ड.

Virat Kohli Retired News Update

Virat Kohli Retired News Update

मुंबई तक

12 May 2025 (अपडेटेड: 12 May 2025, 02:05 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर.

point

कसोटीत निवृत्ती जाहीर केली नसती तर सचिन तेंडुलकरचाही रेकॉर्ड ब्रेक केला असता.

Virat Kohli Retired : रोहित शर्मानंतर आता टीम इंडियाची रनमशीन म्हणून नावारुपाला आलेल्या विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.  14 वर्षांच्या कारकिर्दीच्या आठवणींना उजाळा देत त्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याने मैदानावर निस्वार्थी खेळ दाखवला. त्याने अनेक दिग्गजांचे विक्रम मोडले आहेत. मात्र, त्याला न मोडता आलेल्या विक्रमाची माहिती जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

हेही वाचा : Maharashtra SSC Board Result 2025: मोठी बातमी, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, 'या' दिवशी पाहता येईल निकाल

विराट कोहलीने 17 कसोटी सामन्यात 1 हजार 96 रन्स केल्या आहेत. तर दुसरीकडे क्रिकेटचा देव अशी ओळख असणाऱ्या सचिन तेंडुलकरने 30 इनिंग्समध्ये 1 हजार 575 धावा केल्या होत्या. या तुलनेत सचिन तेंडुलकरच्या अधिक धावा आहेत. 

वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा खेळाडूची उत्कृष्ट बॅट्समन अशी ओळख निर्माण होते. वनडे क्रिकेटमध्ये विराटने चांगली कामगिरी केली. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्याला वनडेच्या तुलनेत म्हणावी अशी कामगिरी करता आली नाही. त्याने कसोटीमध्ये 10 हजारांहून कमी धावा केल्या आहेत. 

टीम इंडियाने 589 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात 181 सामन्यात विजय मिळवला आहे. अशातच सचिन तेंडुलकर हा सर्वाधिक 72 सामन्यात होता. ज्यात या सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवता आला होता. त्यामुळे अनेकजण विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरची तुलना करतात. पण सचिन अव्वल असल्याचं त्याच्या कारकिर्दीतून दिसून येतं. 

हेही वाचा : CBSE Result 2025 : सीबीएसई बोर्डाचा निकाल कधी लागणार? 'या' लिंकवर पाहा रिझल्ट, 42 लाख विद्यार्थी..

सचिनचा रेकॉर्ड मोडण्याची होती संधी

विराट कोहलीने कसोटी सामन्यांमध्ये 4 हजार 746 रन्स बनवल्या आहेत. तर दुसरीकडे सचिन तेंडुलकरने 5 हजार 946 रन्स बनवल्या आहेत. विराटला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्यासाठी 1 हजार 201 रन्सची आवश्यकता होती. मात्र, त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याने त्याला सचिनचा रेकॉर्ड मोडता येणार नाही. 
 

    follow whatsapp