Dhoom fame actress Rimi Sen : अभिनेत्री रिमी सेन हिने कधीकाळी आपल्या सौंदर्याने, सहज अभिनयाने आणि चित्रपटांमधील भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गाजवलं. हंगामा, धूम, गोलमाल, फिर हेरा फेरी सारख्या सुपरहिट चित्रपटांतून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. सलमान खान, आमिर खानसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करणारी रिमी अचानकच ग्लॅमर वर्ल्डपासून दूर गेली. अनेक वर्षे ती लाइमलाईटपासून गायब होती. मात्र अलीकडेच ती पुन्हा चर्चेत आली आहे. तीही तिच्या बदललेल्या रुपामुळे आणि नव्या व्यवसायामुळे.... अभिनेत्रीचा लूक एवढा बदललाय की चाहत्यांना ओळखणे देखील मुश्कील झाले आहे.
ADVERTISEMENT
रिमी सेनचं रुपडं पालटलं, चाहत्यांना ओळखताही येईना
रिमी सेन आता भारत सोडून दुबईत स्थायिक झाली आहे. पण विशेष म्हणजे आता ती कॅमेऱ्यासमोर अभिनय करताना दिसत नाही, तर रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करत आहे. एका पॉडकास्ट आणि मुलाखतीदरम्यान रिमीने तिच्या या नव्या प्रवासाबद्दल सविस्तरपणे भाष्य केलं. रिमी सेनचं बदललेलं रुपही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक वर्षांनंतर ती सार्वजनिक ठिकाणी दिसली, तेव्हा अनेक चाहत्यांना तिला ओळखताही आलं नाही. सोशल मीडियावर ‘प्लास्टिक सर्जरी’चे कयास लावले गेले. यावर स्पष्टीकरण देताना रिमीने हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं, “लोकांना वाटत असेल की मी प्लास्टिक सर्जरी केली आहे, तर ती चांगली गोष्ट आहे. पण मी फक्त फिलर्स, बोटॉक्स आणि पीआरपी ट्रीटमेंट केली आहे”
बॉलिवूड सोडण्यामागचं कारणही रिमीने स्पष्ट केलं. तिच्या मते, हिंदी चित्रपटसृष्टीत विशेषतः महिलांसाठी करिअरचा कालावधी फारच कमी असतो. “हा पुरुषप्रधान उद्योग आहे. सलमान खान, शाहरुख खान 20-30 वर्षांनंतरही मुख्य भूमिका करत आहेत. पण त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्री आज सपोर्टिंग रोल्स किंवा आईच्या भूमिका करत आहेत,” असं ती म्हणाली. रिमीने बॉलिवूडला अलविदा केला. आज ती दुबईत रिअल इस्टेटसारख्या स्थिर आणि सुरक्षित व्यवसायात यशस्वीपणे कार्यरत आहे. अभिनयातून व्यवसायाकडे वळलेली रिमी सेन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
दुबईतील व्यवसायाबाबत काय म्हणाली रिमी?
रिमी सेन म्हणते, “दुबई हे जगभरातून येणाऱ्या लोकांचं स्वागत करणारं शहर आहे. इथे फिल्म बॅकग्राउंड असलेल्या लोकांनाही संधी मिळते. रिअल इस्टेट इथे खूप शिस्तबद्ध पद्धतीने चालतं. एजंट, एजन्सी आणि डेव्हलपर्स यांचं काम स्पष्टपणे विभागलेलं आहे. त्यामुळे सिस्टीम स्मूथ आहे.” भारताशी तुलना करताना ती म्हणते, “भारतामध्ये दोन महिन्यांचं ब्रोकरेज मागितलं, तर लोक गुन्हा केल्यासारखं पाहतात. पण दुबईत नियम स्पष्ट आहेत आणि सगळ्यांसाठी समान आहेत.”
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











