Sameer Khakkar : नुक्कड़मधील खोपडी फेम अभिनेते समीर खाखरांचं निधन

Sameer khakhar Passed Away : मनोरंजन क्षेत्रातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते समीर खाखर (Sameer Khakhar) यांचे निधन झाले. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. नुक्कड (Nukkad) या टीव्ही शोमधील खोपडी या व्यक्तिरेखेतून त्यांना ओळख मिळाली. त्यांनी अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Legendary actor Sameer Khakhar […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:45 AM • 15 Mar 2023

follow google news

Sameer khakhar Passed Away : मनोरंजन क्षेत्रातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते समीर खाखर (Sameer Khakhar) यांचे निधन झाले. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. नुक्कड (Nukkad) या टीव्ही शोमधील खोपडी या व्यक्तिरेखेतून त्यांना ओळख मिळाली. त्यांनी अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Legendary actor Sameer Khakhar dies at 71; Mourning Bollywood)

हे वाचलं का?

वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

समीर खाखर यांना श्वासोच्छवास आणि इतर वैद्यकीय समस्या होत्या. काल त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर समीर खाखर यांना मुंबईतील बोरिवली येथील एमएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोशल मीडियावर समीर खाखर यांच्या निधनाची बातमी ऐकून चाहते दु:खी झाले आहेत. समीर खाखर यांच्या निधनाने चाहते आणि सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला. सर्वजण ओल्या डोळ्यांनी अभिनेत्याला आदरांजली वाहत आहेत.

फार्म हाऊस, हार्ट अटॅक की हत्येचा कट?, सतीश कौशिकांच्या शेवटच्या 12 तासातील कहाणी

चार दशक काम

समीर खाखर यांनी 4 दशकं मनोरंजन क्षेत्रात काम केले. मधल्या काळात त्यांनी अभिनय कारकिर्दीतून ब्रेक घेतला आणि ते अमेरिकेत स्थायिक झाले. त्यानंतर काही काळानंतर परत आले आणि त्यांनी दोन गुजराती नाटकांमध्ये काम केले. ते सलमान खानच्या जय हो या चित्रपटातही दिसले होते. हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. ते चित्रपट आणि टीव्हीवरही तितकेच सक्रिय होते. समीर खाखर शेवटचे टीव्ही शो संजीवनीमध्ये दिसले होते. या शोमध्ये सुरभी चंदना आणि नमित खन्ना मुख्य भूमिकेत होते.

“माझ्या पतीनेच अभिनेते सतीश कौशिक यांची हत्या केली”, महिलेनं सांगितलं कारण

समीर खाखर यांनी नुक्कड व्यतिरिक्त सर्कस, मनोरंजन, श्रीमान श्रीमती, अदालत यात काम केले होते. हसी तो फसी, पटेल की पंजाबी शादी, पुष्पक, दिलवाले, राजा बाबू, परिंदा आणि शहेनशाह यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. हिंदी शो आणि चित्रपटांव्यतिरिक्त गुजराती रंगभूमीवरही त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. समीर खाखर जेव्हा कधी पडद्यावर दिसायचे तेव्हा त्यांचा दमदार अभिनय पाहून चाहते वेडे व्हायचे. त्यांच्या अभिनयाच्या व्यक्तिरेखेशी जुळवून घेणे प्रत्येकासाठी सोपे नव्हते. या दमदार अभिनयामुळे ते वर्षानुवर्षे रसिकांची मने जिंकत होते. समीर कोणत्याही भूमिकेत योग्य बसायचे. समीर खाखर यापुढे आपल्यात नसतील, पण त्याच्या पात्रांमुळे ते चाहत्यांच्या आठवणीत सदैव जिवंत राहील.

अभिनेते सतीश कौशिक यांचा मृत्यू कशामुळे झाला?

    follow whatsapp