Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या बंगल्यात थेट घुसले, मुंबई पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरात घुसून चोरी करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. शिल्पा शेट्टी ही सध्या इटलीमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.

two men break into bollywood actress shilpa shetty bungalow in juhu mumbai arrested

two men break into bollywood actress shilpa shetty bungalow in juhu mumbai arrested

मुंबई तक

• 02:21 PM • 16 Jun 2023

follow google news

देव कोटक, मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (actress Shilpa Shetty) सध्या इटलीमध्ये सुट्टी घालवत आहे. पण असं असताना, शिल्पाच्या घरात घुसून चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. याच प्रकरणी तातडीने कारवाई करत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणात दोघांना अटकही केली आहे. ही घटना शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील घरी घडली. एका पोलीस अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या घरातून काही मौल्यवान वस्तू गायब आहेत. असे सांगण्यात येत आहे की, तिच्या लहान मुलीच्या काही वस्तूही चोरट्यांनी पळवून नेल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणात शिल्पा शेट्टी किंवा राज कुंद्रा यांच्याकडून सध्या कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. ताब्यात घेतलेल्या दोघांची पोलिस सध्या चौकशी करत आहेत. (two men break into bollywood actress shilpa shetty bungalow in juhu mumbai arrested)

हे वाचलं का?

पोलिसांनी तातडीने कारवाई केली

मुंबई पोलीस अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पाच्या घरात चोरीची तक्रार मिळताच त्यांनी तत्काळ कारवाई केली, त्यानंतर पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर अटक केली. शिल्पा शेट्टीच्या हाऊसकीपिंगने अशी माहिती दिली आहे की, दोन्ही चोरट्यांनी घरातून काही मौल्यवान वस्तू चोरून नेल्या आहेत. तसेच दोघेही चोर हे घरात बरेच आतपर्यंत शिरले होते. शिल्पाचे घर हे जुहू येथील समुद्रकिनारी बांधले आहे.

शिल्पा शेट्टीच्या घरात चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोरांना अटक

 

या प्रकरणी जुहू पोलीस स्थानकाचे वरिष्ठ निरीक्षक अजितकुमार वर्तक आणि तपास अधिकारी एपीआय विजय धोत्रे आणि कर्मचारी यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून चोरट्याना तात्काळ अटक केली.

शिल्पा शेट्टी इटलीमध्ये

शिल्पा शेट्टीच्या घरी चोरीच्या एक दिवस आधी, तिने स्विमसूटमध्ये एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये तिने आपल्या कुटुंबासह इटलीमध्ये सुट्टी साजरी करत असल्याची माहिती दिली होती. शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे अनेकदा चर्चेत असते, वयाच्या 48 व्या वर्षीही शिल्पाच्या तिच्या सौंदर्याने घायळ करते.

    follow whatsapp