Sangli Crime : राज्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. नुकतीच सांगली येथील वाल्मिकी आवास परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. काही तरुण टोळक्यांनी एका गुन्हेगाराला एडक्याने आणि दगडाने ठेचून ठार केलं आहे. या हल्ल्यात गुन्हेगार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 28 जुलैपासून 'या' राशीतील लोकांचे बदलणार नशीब, पैशांनी भरलेले खिसे राहणार
पोलिसांकडून अवघ्या बारा तासांत घटनेचा छडा
संबंधित प्रकरणात पोलिसांनी अवघ्या बारा तासांत घटनेचा छडा लावला आहे. सहा महिन्यांच्या पूर्ववैमन्यासातून हा खून करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. गुन्हेगाराला ठार करण्यात आलेल्यांची माहिती आता समोर आली आहे.
ठार मारण्यात आलेल्या तरुणाचं नाव सौरभ बापू कांबळे (वय 20) असे आहे. तर या प्रकरणात पोलिसांनी इतर दोघांना अटक केली आहे. करण महादेव गायकवाड (वय 20) तर युवराज हणमंत गायकवाड (वय 19) अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत. संबंधित प्रकरणात सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दोघांवर कारवाई केली आहे.
हेही वाचा : कोकणासह रायगड, रत्नागिरीत मान्सून कायम, पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यावरील मान्सून स्थिती कशी?
संबंधित प्रकरणात अधिक सांगण्यात आलं की, मयत सौरभ कांबळे हा वाल्मिकी आवास योजना परिसरातील रहिवासी आहे. त्याच्यावर मारामारीसह इतर काही दोन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच वादाचा राग मनात ठेवून शनिवारी काही संशयित टोळक्यांनी सौरभला वाल्मिकी आवास परिसरात हत्या केली होती. यावेळी सर्व आरोपी शेतातून या आवास परिसरात शिरकाव केला होता.
ADVERTISEMENT
