कोकणासह रायगड, रत्नागिरीत मान्सून कायम, पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यावरील मान्सून स्थिती कशी?

Maharashtra Weather : हवामान विभागाने राज्यातील हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. 14 जुलै रोजी हवामानाच्या (IMD) नुसार अंदाजाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.

maharashtra weather forecast update

maharashtra weather forecast update

मुंबई तक

• 07:00 AM • 14 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

हवामान विभागाने राज्यातील हवामानाचा अंदाज वर्तवला

point

14 जुलै रोजी हवामानाच्या अंदाजाबाबत महत्त्वाची अपडेट

Maharashtra Weather : हवामान विभागाने राज्यातील हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. 14 जुलै रोजी हवामानाच्या (IMD) नुसार अंदाजाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. जुलै महिन्यात मुसळधार पावसाची शक्यता असतेच. हाच अंदाज लक्षात घेता कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. याचबाबत एकूण माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

हेही वाचा : पुणे हादरलं! पान पट्टीवर तरुण खात होता पान, शुल्लक कारणावरून झाला वाद, कोयत्याने सपासप वार अन्...

कोकणातील मान्सूनची स्थिती

कोकणसह, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मध्यम ते जोराचा मान्सून अपेक्षित आहे. विषेशकरून रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातील मान्सूनस्थिती 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेष करून पुणे आणि साताऱ्यात घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे. तसेच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आपली हजेरी लावणार आहे. हवामान विभागाने शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, कारण दमट हवामानामुळे पिकांवर त्याचा चांगला परिणाम होतो. 

मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील हवामान

मराठवाडा या विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा मान्सून हजेरी लावेल अशी शक्यता आहे. तर ढगसदृश्यस्थिती कमी असेल, पण काही भागांमध्ये जोराचा पाऊस पडेल. 

विदर्भात नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यातील उत्तर-मध्यम महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. 

तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये विशेषत: नाशिकच्या घाट परिसरात मध्यम प्रमाणात पावसाची शक्यता आहे. 

हेही वाचा : झीशान झाला 'समर'.. धर्मांतरणासाठी तरुणीवर दबाव, शरीरसुख अन् दीड लाखांना लुटलं...हादरवून टाकणारी घटना

'या' जिल्ह्यांना रेड आणि येलो अलर्ट जारी

ठाणे, रायगड, पुणे, नाशिक आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावासाचा येलो अलर्ट जारी केला आहे. 

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. 

    follow whatsapp