Today Shocking Viral News : बिहारची राजधानी पटनामध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबंध केल्यानंतर एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. ही घटना जक्कनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी घडली. पीडित मुलगी जहानाबाद येथील रहिवासी आहे. 10 दिवसांपूर्वीच तिची ओळख मसौढी येथील एका अल्पवयीन मुलासोबत झाली होती. रिपोर्टनुसार, मुलाने त्याच्या मित्राच्या रूमवर पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध केले. संबंध करताना मुलीला रक्तस्त्राव झाला. त्यामुळे पीडितेची तब्येत बिघडली आणि तिला रुग्णालयात दाखल केलं. पण उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
पटनामध्ये घडला धक्कादायक प्रकार, पोलिसांनी तपास सुरु केला अन्..
शनिवारी या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वेगानं तपास सुरु केला. पोलिसांनी मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. तसच मुलगा आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी सुरू आहे. दोघांचीही जहानाबाद स्टेशनवर 10 दिवसांपूर्वी ओळख झाली होती. मुलाने या मुलीला शुक्रवारी पटनाला बोलावलं होतं. त्यानंतर त्याने मुलीला करबिगहिया परिसरात मित्राच्या घरी नेलं. तिथे दोघांनीही शारीरिक संबंध केले. तेव्हा मुलीच्या शरीरातून खूप रक्तस्त्राव झाला.
हे ही वाचा >> मुंबईची खबर: मुंबईत मिळणार स्वस्तात घर! 'MHADA' मध्ये निघाली मोठी लॉटरी, बघा तुमचा नंबर लागतोय का..
त्यानंतर मुलगा खूप घाबरला. तो त्या मुलीला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला. मुलीची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला पीएमसीएच रेफर केलं. जेव्हा मुलीला पीएमसीएचमध्ये दाखल केलं, तेव्हा डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. जक्कनपूरचे पोलीस अधिकारी मनीष कुमार यांनी म्हटलंय की, तक्रार नोंदवल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल. दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.
मुलीच्या काकांनी सांगितलं की, तिने पाचवीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर तिने शाळेत जाणं सोडून दिलं. ती वडिलांकडे जहानाबादला जाणार आहे, असं सांगून घरातून निघाली होती. ती पटनामध्ये कशी पोहोचली, याबाबत कुटुंबियांना माहिती नाही. पोलिसांनी ज्या मुलाला पकडलं आहे, त्यालाही कुटुंबियांमध्ये कोणीही ओळखत नाही.
हे ही वाचा >> पुणे हादरलं! पान पट्टीवर तरुण खात होता पान, शुल्लक कारणावरून झाला वाद, कोयत्याने सपासप वार अन्...
ADVERTISEMENT
