माणुसकीला काळीमा! शिक्षकाने विद्यार्थीनीला शरीरसुखाची केली मागणी, कॅम्पसमध्ये विद्यार्थीनीनं अंगावर रॉकेल ओतून...

Odisha Crime : ओडिशातील बालासोरमधील फकीर मोहन कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एका पीडित तरुणीने स्वत:वर रॉकेल टाकून पेटवून घेतलं.

Odisha Crime

Odisha Crime

मुंबई तक

13 Jul 2025 (अपडेटेड: 13 Jul 2025, 02:53 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

फकीर मोहन कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थीनीनं घेतलं पेटवून

point

शिक्षकाने विद्यार्थीनीला शरीरसुखाची केली मागणी

Odisha Crime : ओडिशातील बालासोरमधील फकीर मोहन कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एका पीडित तरुणीने स्वत:वर रॉकेल टाकून पेटवून घेतलं. संबंधित प्रकरण हे महाविद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केले आहे. पीडित तरुणीने केलेल्या कृत्याने ओडिसा हादरून गेलं आहे. विद्यार्थीनीने स्वत:ला जेव्हा पेटवून घेतलं तेव्हा एका विद्यार्थ्याने वाचवण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित विद्यार्थ्यालाही भाजलं. दरम्यान, विद्यार्थीनीला आणि तरुणाला एका रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर आहे. विद्यार्थीनी ही बी.एडच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : मोठी बातमी! पराभूत झालेल्या उज्ज्वल निकम यांची राज्यसभेचे खासदार म्हणून नियुक्ती

बी.एड. विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुमार साहू यांच्यावर पीडितेसह इतर काही विद्यार्थ्यांनी मानसिक आणि शारीरिक शोषणाचा आरोप केला. बी.एडचे प्रमुख समीर कुमार साहू यांच्याविरोधात विद्यालयाच्या प्रशासनाने तक्रार दाखल केली. मात्र, विभाग प्रमुखावर कोणतीही करवाई न झाल्याने विद्यार्थीनीने स्वत:ला पेटवून घेतल्याचं कारण समोर आलं आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

संबंधित प्रकरणात बी.एड. विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुमार साहू विरोधात प्राचार्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली. विभाग प्रमुख हे त्यांचे मानसिक शोषण करतात, असा आरोप करण्यात आलेा आहे. एका विद्यार्थिनीचं म्हणणं आहे की, विभागप्रमुखाने तिला चुकीचा स्पर्श केला. विभाग प्रमुखावर यापूर्वीही तक्रार दाखल केली होती, परंतु विभाग प्रमुख शिक्षकावर कोणतीही कारवाई केली नसल्याचं दुर्दैव आहे. 

या घटनेबाबत आता महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप कुमार घोष यांनी सांगितलं की, 30 जून रोजी विभागप्रमुख समर साहूबाबत माझ्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की, समीर कुमार साहू हा पीडित विद्यार्थीनीला मानसिक त्रास देतो. एका विद्यार्थीनीने पीडितेला बागेजवळ शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच दिवशी विद्यार्थीनीने पोलिसांना बोलावले. दरम्यान, या प्रकरणात कॉलेजच्या प्राचार्यांनीही लक्ष्य घातले. 

प्राचार्य काय म्हणाले? 

प्राचार्य म्हणाले की, आम्ही विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, कॉलेजच्या अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली आहे. त्यात शिक्षिका, काही सदस्यांचाही समावेश केला आहे. तसेच काही विद्यार्थी हे कारवाईची मागणी करू लागले होते. तेव्हा तरुणी प्राचार्यांना भेटण्यासाठी गेली होती. त्यानंतर कॉलेज विभाग प्रमुखाच्या त्रासाला कंटाळलेल्या विद्यार्थीनीने कॅम्पसमध्येच अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतलं. 

हेही वाचा : बीड जिल्ह्यात चाललंय तरी काय? माजी सरपंचाकडून धारदार कोयत्याने तरुणाच्या डोक्यात सपासप वार, कारण ऐकून बसेल धक्का

हे प्रकरण उघड पडल्यानंतर पोलिसांनी विभागप्रमुख समीर कुमार साहू नावाच्या शिक्षकाला अटक केली. ओडिशा सरकारने प्राचार्य घोष यांना तात्काळ निलंबित केले. त्यांना कोणाच्याही परवानगीशिवाय शहराबाहेर जाता येणार नाही, असे सांगण्यात आले. 

    follow whatsapp