Viral Video : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एका भाजप नेत्याला आक्षेपार्ह परिस्थितीत पकडल्याची घटना समोर आली आहे. संबंधित नेत्याचे नाव राहुल वाल्मिकी असल्याची माहिती समोर येत आहे. अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हामंत्री म्हणून राहुल वाल्मिकी यांना स्थानिक लोकांनी एका महिलेसोबत कारमध्ये पकडले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी शिकारपूर कोतवाली परिसरातील कैलावन गावातील स्मशानभूमीजवळ घडली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मोठी बातमी! जयंत पाटील यांचा शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, 'हा' नेता पदभार सांभाळणार
नेमकं प्रकरण काय?
शुक्रवारी सायंकाळी कैलावन गावातील स्मशानभूमीजवळ एक कार उभी होती. त्या कारमध्ये काही तरी सुरु असल्याचा प्रकार स्थानिकांना दिसून आला. तेव्हा स्थानिकांनी कारची तपासणी केली असता, कारमध्ये वाल्मिकी आणि एक विवाहित महिला आक्षेपार्ह परिस्थितीत आढळून आली. स्थानिकांनी व्हिडिओ शूट करत मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. आवाजाच्य दरम्यान, राहुल कारमधून बाहेर पडला असता. त्याने फक्त अंतर्वस्त्त्र आणि शर्ट परिधान केले होते. त्यावेळी महिलेनं ओढनीने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला होता.
या घटनेनंतर राहुल वाल्मिकी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तो शुक्रवारी रात्री परिसरात दिसला होता, परंतु त्यानंतर तो गायब झाला. तो दिल्लीला गेला आणि तिथून त्यानं मुंबई गाठली असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : पुणे तिथे काय उणे! तरुणाचा मित्राकडून अनोखा वाढदिवस साजरा, हवेत दोन राउंड फायरिंग, नेमकं 'त्या' रात्री काय घडलं?
राहुल वाल्मिकी हा विवाहित आहे आणि त्याच्या कुटुंबात त्यांची पत्नी, एक मु लगा आणि एक मुलगी आहे. त्यांचे वडील कंत्राटदार आहेत. या घटनेनंतर कुटुंबातील मूग गिळून गप्प आहेत. याबाबत कोणी काही बोलत नाही.
ADVERTISEMENT
