Beed Crime : बीड जिल्ह्याचा बिहार झालाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही वर्षांपासून बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. बीड जिल्ह्यात राजकारण्यांसह त्यांच्या आकांच्या आकांचे मोठ्या प्रमाणात नेटवर्क पाहायला मिळतात आणि त्यातून गुन्हेगारीला खतपाणी घातलं जातं. आता बीडमध्ये एका सरपंचाने एका तरुणाला जमिनीच्या वादातून कोयत्याने डोक्यात वार केले आहेत. ही घटना बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी येथील आहे. संबंधित पीडिताला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मोठी बातमी! जयंत पाटील यांचा शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, 'हा' नेता पदभार सांभाळणार
माजी सरपंचाकडून तरुणाच्या डोक्यात सपासप वार
प्रकाश काशीद असं जखमी तरुणाचं नाव आहे. तर हल्लेखोर असणाऱ्या माजी सरपंचाचे नाव गोरख काशीद असे आहे. जमिनीच्या वादातूनच माजी सरपंचाने धारदार कोयत्याने तरुणाच्या डोक्यात सपासप वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. लोटस खासगी रुग्णालयात संबंधित पीडित तरुणावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली. सध्या पीडित रुग्णाची परिस्थिती चिंताजनक आहे.
संबंधित प्रकरणात पीडिताच्या कुटुंबियांनी पोलिसांनी गुन्हा न दाखल केल्याचा आरोप केला. अनेकदा तक्रार दाखल करूनही पोलीस तक्रार दाखल करत नाहीत. राजकीय दबावामुळे पोलिसांनी एफआरआय नोंदवण्यास नकार, दिला असा आरोप केला. पीडिताची परिस्थिती पाहता त्याच्या कुटुंबियांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे न्यायाची मागणी केली.
हेही वाचा : वाल्मिकीसोबत महिला बंद कारमध्ये आक्षेपार्ह स्थितीत...स्थानिकांनी मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ केले शूट
माजी सरपंचाविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात माजी सरपंचाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सरपंचाला न्यायालयात हजर केले. वारंवार मारहाणीच्या घडत असलेल्या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान, या संबंधित प्रकरणातील पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
