लग्नाच्या पहिल्याच रात्री घडलं मोठं कांड! नवरीचं 'ते' खतरनाक सीक्रेट आलं समोर..गावकऱ्यांमुळं नवरा वाचला!

Groom And Bride Shocking News : राजस्थानच्या जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे. येथील एका नवरीनं लग्नाच्या पहिल्याच दिवशी सासरहून फरार होण्याचा प्लॅन केला होता.

वधू आणि वराची ai प्रतिमा

जयमाला नंतर, वधूने नाते तोडले

मुंबई तक

• 03:48 PM • 13 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवरीने लग्नाच्या पहिल्या रात्री केलं मोठं कांड

point

नवऱ्यासोबत नेमकं घडलं तरी काय?

point

नवरीचे कारनामे पाहून पोलिसही चक्रावले

Groom And Bride Shocking News : राजस्थानच्या जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे. येथील एका नवरीनं लग्नाच्या पहिल्याच दिवशी सासरहून फरार होण्याचा प्लॅन केला होता. कारण ती नवरी चोरांच्या गँगमध्ये सामील होती. लग्नाच्या नावाखाली लूटमार करण्याचा धंदा त्यांनी सुरु केला होता. स्थानिक लोकांच्या सतर्कतेमुळं नवरीचा प्लॅन फसला आणि गँगचा पर्दाफाश झाला. 

हे वाचलं का?

लग्नानंतर धक्कादायक माहिती आली उघडकीस 

हे प्रकरण किशनगढ रेनवाल येथील भादवा गावातील आहे. अजय कुमार नावाच्या तरुणाने ग्वालियरच्या एका तरुणीसोबत दिल्लीमध्ये लग्न केलं होतं. या लग्नासाठी अजयने एजंट्सला 1.90 लाख रुपये दिले होते. लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर नवरा-नवरी गावात पोहोचले. पण लग्नाच्या पहिल्याच दिवशी पत्नीने खरं रुप दाखवलं. ती सासरच्या घरून पळण्याच्या तयारीत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरी गावात पोहोचल्यानंतर दोन गाड्यांमध्ये काही संशयास्पद लोकही भादवा येथे पोहोचले.

हे ही वाचा >> "दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न..." नाराज वडिलांनीच राधिकाची केली हत्या; नवीन अपडेट आली समोर!

हे लोक नवरीला पळवून नेण्याचा प्लॅन करत होते. स्थानिक लोकांना त्यांच्या संशयास्पद कृत्याबाबत कळलं. तेव्हा त्यांनी तातडीनं कारवाई केली. गावकऱ्यांनी गाड्यांना घेराव घालून तीन तरुणांना पकडलं. जे नवरीसोबत निघाले होते. हे लोक लग्नाच्या नावाखाली चोरी करणाऱ्यांच्या गँगमध्ये सामील होते. स्थानिक लोकांनी या चोरांना कुटलं आणि एका झाडाला बांधलं. तसच त्यांच्या गाड्याही फोडल्या.

घटनेची माहिती मिळताच रेनवाल पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी गँगच्या काही लोकांना अटक केली. पंरतु, आतापर्यंत याप्रकरणी कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली नाही. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, हे चोरटे सामान्य लोकांना लग्नाच्या जाळ्यात अडकवून त्यांची लूट करतात. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, या गँगचा चोरीचा प्लॅन पूर्वनियोजीत असतो. गँगमधील भामटे तरुणांना लग्नाचं आमिष दाखवतात. त्यानंतर लग्नाच्या दिवशी नवरीला पळवून नेतात. अशाप्रकारचे गँगचे लोक सामान्य लोकांना टार्गेट करतात.

हे ही वाचा >> पत्नीचा पारा चढला! पतीच्या अंगावर फेकलं मिरची पावडरचं उकळतं पाणी.. बेडरूममध्ये घडलं तरी काय?

    follow whatsapp