6 वर्ष छोट्या तरुणासोबतच्या अनैतिक संबंधाला चटावलेली बीना, पती घरी असतानाही त्याला बोलवायची अन्..

Crime News: प्रियकराला पिस्तूल देऊन पतीला गोळी घालणाऱ्या पत्नीचे धक्कादायक कृत्य समोर आले आहे. तिच्या मुलांनी स्वतः पोलिसांना सांगितले की, वडील नसताना त्यांची आई अनेकदा तिच्या प्रियकराला घरी बोलावत असे. जाणून घ्या काय आहे प्रकरण.

बॉयफ्रेंडने केली बीनासाठी तिच्या पतीची हत्या

बॉयफ्रेंडने केली बीनासाठी तिच्या पतीची हत्या

मुंबई तक

12 Jul 2025 (अपडेटेड: 12 Jul 2025, 09:35 AM)

follow google news

अलिगढ: अलिगढमध्ये, पत्नीच्या प्रेमप्रकरणात अडथळा ठरणाऱ्या सुरेश (वय 32 वर्ष) याची गुरुवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना त्याची पत्नी बिनाच्या सांगण्यावरून तिचा प्रियकर मनोजने घडवून आणली. आरोपी पिस्तूल घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि आत्मसमर्पण केले. पोलिसांनी या प्रकरणी बिनालाही अटक केली. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. पत्नी बिनाची कृत्ये आता उघडकीस येत आहेत.

हे वाचलं का?

बीना 6 वर्ष छोट्या मनोजच्या प्रेमात गुरफटली अन् सगळ्या आयुष्याचा झाला खेळखंडोबा…

बिना गेल्या 8 वर्षांपासून तिच्या पतीची फसवणूक करत होती. मुलांनी स्वतःच त्यांच्या आईचे हे कृत्य उघड केले आहे. पती दिल्लीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा. जेव्हा तो नसायचा तेव्हा प्रियकर घरी येत असे. नवरा घरी असतानाही प्रियकर रात्री येत असे. तीन मुलांची आई बीना अनैतिक संबंधाला एवढी चटावली होती की,  ती तिच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराला घरी बोलवायची तेव्हा ती तिच्या मुलांच्या आणि पतीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिक्स करायची. 

दरम्यान, आता सुरेशच्या हत्येनंतर बीनाच्या मुलांनी पोलिसांना तिच्या विरोधात नेमका जबाब दिला आहे.

हे ही वाचा>> पत्नी OYO हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत गेली, मागून आला पती.. महिलेने 'त्या' अवस्थेतच काढला पळ, Video प्रचंड व्हायरल!

सुमारे 12 वर्षांपूर्वी सुरेश आणि बीना यांचं लग्न झालं होतं झाले. या जोडप्याला 10 वर्षांचा नितेश, 8 वर्षांचा पुनीत आणि 6 वर्षांची रोशनी अशी तीन मुले होती. सुरेश लग्नापासून दिल्लीत काम करत होता. तो आठवड्यातून किंवा दहा दिवसांनी एकदा सुट्टी घेऊन त्याच्या कुटुंबाला भेटायला यायचा. पोलिसांचे म्हणणे आहे की, बीना मनोजच्या प्रेमात पडली, ज्याचे तिच्या घरापासून अगदीच जवळ दुकान होते. शेजारी असल्याने मनोजही तिच्या घरी नेहमी यायचा.

बीना आणि मनोजच्या अनैतिक संबंधाबाबत त्यांच्या परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली. जेव्हा सुरेश दिल्लीहून आला तेव्हा त्याने आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिला ती गोष्ट मान्य नव्हती. त्यानंतर सामाजिक दबाव आणण्यासाठी गावात पंचायती घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

तीन पंचायतींमध्ये दोघांना वेगळे राहण्याचे आदेश देण्यात आले. पण ते शहराबाहेर किंवा रात्रीच्या अंधारात गुप्तपणे भेटू लागले. सुरेश तिथे नसताना किंवा सुरेश घरी नसतानाही दोघे भेटत असत. किंवा बीना जेवणात झोपेच्या गोळ्या देऊन कुटुंबाला झोपी घालवायची आणि त्यानंतर ती मनोजला घरीच बोलवायची.

हे ही वाचा>> न्यूड केलं अन् 'ओरल सेक्स' करायला लावलं, Video केला शूट; मुंबईतील धक्कादायक घटना

पोलिसांच्या मते, तपासात असे दिसून आले आहे की या दोघांना एकदा पोलिसांनी अलिगडमधील एका हॉटेलमध्येही पकडले होते. पण तेव्हा त्यांची सुटका झाली होती. त्याचप्रमाणे, एकदा हे दोघे दिल्लीत देखील पकडले गेले होते. पण तिथूनही त्यांची सुटका झालेली. चार महिन्यांपूर्वीही दोघेही गावात आक्षेपार्ह स्थितीत पकडले गेले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सुरेश दिल्लीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्याची पत्नी बीना तीन मुलांसह गावात राहत होती. कुटुंबीयांशी चौकशी केली असता असे आढळून आले की, सुमारे आठ वर्षांपूर्वी सुरेशच्या पत्नीचे शेजारीच किराणा दुकान असलेल्या अविवाहित तरुण मनोजशी प्रेमसंबंध होते. 

सुरेश आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाने या नात्याला विरोध केला. पण बीना आणि मनोज एकत्र राहण्याचा दृढनिश्चय केला होता. सुरेश तीन दिवसांपूर्वी दिल्लीहून गावात आला होता. त्याला गुरुवारी परत जावे लागणार होते.

सुरेश सकाळी घराजवळच बसून मोबाइल पाहत होता. त्यानंतर तिथे आलेल्या मनोजने अचानक त्याच्यावर पिस्तूलने गोळी झाडली. सुरेशचा मोठा भाऊ विजय याने मनोजवर लोखंडी वस्तूने वार करण्याचा प्रयत्न केला. तर मनोजने त्याच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये तो जखमी झाला.

बीनाने तिच्या पतीपासून सुटका मिळवण्यासाठी तिचा प्रियकर मनोजसोबत मिळून रचलेल्या कटामुळे पोलिसही हादरून गेले. पोलिसांनी सांगितलं की, दोघांनीही सुरेशला मारण्यासाठी दोन योजना आखल्या होत्या. पहिली योजना होती, झोपेत त्याचा गळा दाबून खून करण्याची. पण त्यात ते यशस्वी होऊ शकले नाही. तेव्हा बीनाने मनोजला पिस्तूल दिले आणि सुरेशला मारल्यानंतरच तुझा चेहरा मला दाखव असं बजावलं होतं. तिने त्याला इतक्या गोळ्या घालण्यास सांगितले की, तो वाचणार नाही. चौकशीदरम्यान मनोजने हे सगळं मान्य केलं आहे.
 

    follow whatsapp