बॉलिवूडवर शोककळा! यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचे निधन

मुंबई तक

20 Apr 2023 (अपडेटेड: 20 Apr 2023, 09:05 AM)

Pamela Chopra passes away : बॉलिवुडचे दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला (Pamela Chopra) यांचे निधन झाल्याची दु:खद घटना घडलीय. आज पहाटे रूग्णालयात त्यांनी वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

yash chopras wife pamela chopra passes away

yash chopras wife pamela chopra passes away

follow google news

Pamela Chopra passes away : बॉलिवुडचे दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला (Pamela Chopra) यांचे निधन झाल्याची दु:खद घटना घडलीय. आज पहाटे रूग्णालयात त्यांनी वयाच्या 74व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 15 दिवसापासून त्या लिलावती रूग्णालयात अॅडमिट होत्या.वयाच्या कारणास्तव त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान तब्येत आणखीणच बिघडल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवले होते. यावेळी उपचारा दरम्यानच त्याचे निधन झाल्याची घटना घडली होती.या घटनेने बॉलिवूडवर (Bollywood) शोककळा पसरली होती.( yash chopras wife pamela chopra passes away at 74)

हे वाचलं का?

ट्रेड एनालिस्ट कोमल नाहटा यांनी पामेला चोप्रा (Pamela Chopra) यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. पामेला चोप्रा यांचे आज सकाळी निधन झाले. पामेला चोप्रा या आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा यांच्या आई होत्या. तसेच अभिनेत्री रानी मुखर्जी (Rani Mukherji) यांच्या सासू होत्या. पामेला चोप्रा (Pamela Chopra)  यांनी यश चोप्रा यांच्याशी 1970 साली पारंपारीक रीतीरिवाजानूसार लग्न केले होते. दोघांचे अरेंज मॅरेज झाले होते. पती यश चोप्रा यांच्या निधनाच्या 11 वर्षानंतर पामेला यांनी देखील जगाचा निरोप घेतला आहे.

हे ही वाचा >> ‘मुन्नाभाई’तील सर्किटच्या खऱ्या आयुष्याची कहाणी वाचून तुमचाही फ्यूज उडेल!

पामेला चोप्रा (Pamela Chopra) एक प्लेबॅक सिंगर होत्या. यासोबत त्या चित्रपट लेखिका आणि निर्मात्या होत्या. सिनेमाच्या दुनियेत त्यांचे मोठे योगदान होते. यश चोप्रा यांच्या अनेक सिनेमात तिने गाणी गायली आहेत. पण त्यांनी सर्वच गाणी त्यांच्या पतीच्या सिनेमात गायली नाही आहेत. 1993ना रीलीज झालेल्या आयना सिनेमा त्यांनी प्रोड्यूस केला होता.पामेला यांनी पती यश चोप्रा, मुलगा आदित्य चोप्रा आणि प्रोफेशनल रायटर तनुदा चंद्रासोबत 1997 ला आलेल्या ‘दिल तो पागल है’ सिनेमाची स्क्रिप्ट लिहली होती.

पामेला चोप्रा (Pamela Chopra) शेवटच्या यशराजची डॉक्युमेंट्री सीरीज ‘द रोमांटीक्स’ मध्ये दिसल्या होत्या. या सीरीजमध्ये पामेला चोप्रा यांनी पती यश चोप्रा यांचा प्रवास आणि यशराज फिल्मबाबत सांगितले आहे.

हे ही वाचा >> बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीवर कोसळला दु:खाचा डोंगर…

पामेला यांनी ‘कभी कभी’, ‘दुसरा आदमी’, ‘त्रिशुल’, ‘चांदनी’, ‘लम्हे’, ‘डर’,’सिलसिला’, ‘काला पत्थर’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘मुझसे दोस्ती करोगे’ या सिनेमांसह यश चोप्रा (Yash chopra) यांच्या अनेक सिनेमात गाणी गायली आहे. पामेला यांच्या निधनानंतर बॉलीवुडवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडसह आता विविध स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

    follow whatsapp