Sanjay Gaikwad : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा घातल्याची घटना उघडकीस आली. त्यांनी आमदार निवासच्या कॅन्टीन व्यवस्थापकाला मारहाण केली आहे. याचं कारण आता समोर आलं आहे. निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याच्या कारणावरून संजय गायकवाड यांनी हॉटेल व्यवस्थापकाला बेदम मारहाण केली आहे. त्यांच्या मारहाणीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : जुलै महिन्यात 'या' राशीतील लोकांवर धोक्याची टांगती तलवार
नेमकं काय घडलं?
घडलेल्या घटनेनुसार, ही घटना (मंगळवारी 8) रोजी घडली होती. मुंबईस्थित आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यांनी ऑर्डरप्रमाणे रुममध्ये जेवणही दिले. मात्र, जेवणात दिलेलं वरण आणि भात हे शिळं होतं. त्याचा वास येत असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला. त्यावरूनच संजय गायकवाड यांनी आमदार निवासी कॅन्टीन व्यवस्थापकाला आमदाराने धारेवर धरलं आहे.
याच प्रकरणातून संजय गायकवाड यांना संताप अनावर झाल्याने त्यांनी संबंधित व्यवस्थापकाला मारहाण केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. ते इथवरचं न थांबता त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाला शिवीगाळही केली आहे. त्यानंतर कोणीही बील देऊ नका असा सज्जड दम दिला.
हेही वाचा : Personal Finance: कोट्यवधी लोकांसाठी आनंदाची बातमी, व्याजाचे पैसे पीएफ खात्यात!
संजय गायकवाड यांनी कॅन्टीन व्यवस्थापकाच्या कानशीलात लगावली. त्यानंतर ते म्हणाले की, मी याआधीही एक दोन नाही,तर दोन ते तीन वेळा जेवणाबाबत तक्रार केली होती. संजय गायकवाड यांनी केलेल्या कृत्यावरून आता विरोधकांकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतील हे पाहणं गरजेचं आहे.
ADVERTISEMENT
